सर्वांची दाणादाण झाल्यास पुन:आपण आपल्या परिवारांतील एकमेकांनीं एकमेकांस ओळखून काढितां यावें, म्हणून ब्रम्ह्यानें एकंदर सव आपल्या परिवारी लोकांच्या गळ्यांत एक एक पांढर्या सुताच्या पाष्टीचें जातीसूचक चिन्ह, म्हणजे ज्यास हल्लीं ब्रम्हसूत्र म्हणतात, तें घालून व त्या प्रत्येकास एक जातीबोधक बीजमंत्र, म्हणजे ज्यास हल्लीं गायत्री म्हणतात, ती

