हें सर्व ब्रम्हकपट पुढें कधीं शूद्रांच्या ध्यानांत येऊं नये या भयास्तव, अथवा त्या ग्रंथांत पाहिजेल तसे फेरफार करितां यावेत म्हणून त्यांनीं शूद्र वगैरे पाताळीं घातलेल्या लोकांस मुळींच कोणी ज्ञान देऊं नये, असे अनुसंहितेसारिख्या अपवित्र ग्रंथांत फारच मजबूत लेख करून ठेविले आहेत.

