त्या महासुभ्याचा अपभ्रंश म्हसोबा झाला आहे. तो सर्व पीकपाण्याची यथाकळीं तपासणी करून त्याप्रमाणें सूट तूट घालून सर्वांस आनंदांत ठेवीत असे. यामुळें हल्लीं मर्हाठ्यांत एक कूळ असें सांपडणार नाहीं कीं, ज्यांत ते आपल्या शिवारांतील भलत्या एकाद्या दगडास महासुभ्याचे नांवानें शेंदुराचें मांजण करून त्यास ऊद दाखवून त्याचें नांव घेतल्याशिवाय चाड्यावर मूठ ठेवणार नाहींत, शेतांत विळा घालणार नाहींत

