त्यांनीं बांधिलेल्या नेमांचा धिक्कार मागें पुढे कोणी करूं नये, या भयास्तव त्यांनीं ब्रम्ह्याविषयीं अनेक तर्हतर्हेच्या नवीन कल्पित गोष्टी रचिल्या व त्या गोष्टी ईश्वरेच्छेनेंच झाल्या आहेत असा त्या दासांच्या मनावर ठसा उमटावा म्हणून त्यांनीं शेषशाईचें दुसरें आंधळें गारुड रचिलें आणि संधि पाहून कांहीं काळानें त्या सर्व लेखांचे ग्रंथ बनविले.

