त्याचप्रमाणे बाणासुराचे लोक अश्विन शुद्ध दशमीस रात्रीं आपल्या घरोघर गेले, तेव्हां त्यांच्या स्त्रियांनीं पुढें दुसरा बळी येऊन देवाचें राज्य स्थापील, याविषयीं भविष्य जाणून त्यांनीं आपल्या उंबर्यांत उभ्या राहून त्यांस ओंवाळून अशा म्हणाल्या कीं, “इडा पीडा (द्विजांचा अधिकार) जावो आणि बळीचें राज्य येवो.”

