एकंदर सर्व भट-खोतांनीं अमेरिकन स्लेव्ह होल्डरचा कित्ता घेऊन आपल्या मतलबी धर्मांच्या साह्यानें अज्ञानी शूद्रांस सरकारच्या उलट उपदेश केल्यामुळें, बहुतेक अज्ञानी शूद्रांनीं, उलट्या युरोपियन कलेक्टरांवर कंबरा बांधून सरकारास असें म्हणाले कीं, आम्हांवर जो खोतभटजींचा अधिकार आहे तो तसाच राहूं द्यावा, येथें

