आम्ही सर्व शूद्र इंग्रज लोकांचे गुरुबंधु झाल्याबरोबर त्यांच्या एकंदर पूर्वजांच्या कृत्रिमी ग्रंथाचा धिक्कार करूं आणि तेणेंकरून त्यांच्या जात्त्याभिमानाच्या तोंडांत माती पडून त्यांच्यातील तूर्त प्रत्येक ऎदी लोकांस आम्हां शूद्रांच्या श्रमाच्या पोळ्या पोत्या खावयास मिळणार नाहींत.

