आज भट लोकांपेक्षा शूद्रांदि अतिशूद्र लोकांचा भरना सुमारें दसपट अधिक असून भट लोकांनी शूरादि अतिशूद्र लोकांस कसें धुळीस मिळविलें असतें? याचें उत्तर असें आहे कीं, एक शाहाणा मनुष्य दहा अज्ञानी मनुष्यांचें आपणाकडेस मन वळऊन त्यांस तो आपले ताब्यांत ठेऊं शकतो.

