Kindle Notes & Highlights
Read between
June 26 - July 10, 2020
The institution of Caste, which has been the main object of their laws, had no existence among them originally. That it was an after-creation of their deep cunning is evident from their own writings.
But what can have been the motives and objects of such cruel and inhuman Laws?
Their main object in fabricating these falsehoods was to dupe the minds of the ignorant and to rivet firmly on them the chains of perpetual bondage and slavery which their selfishness and cunning had forged.
The severity of the laws as affecting the Sudras, and the intense hatred with which they were regarded by the Brahmins can be explained on no other supposition but that there was, originally between the two, a deadly feud,
At present not one has the moral courage to do what only duty demands, and as long as this continues, one sect distrusting and degrading another sect, the condition of the Sudras will remain unaltered, and India will never advance in greatness or prosperity.
जेव्हां मनुष्य स्वतंत्र असतो तेव्हां त्यास आपले मनांत उभ्द्रवलेले विचार स्पष्ट रीतीनें इतर लोकांस बोलून अथवा लिहून दाखवितां येतात. तेच विचार त्यास स्वतंत्रता नसल्यामुळें मोठे महत्त्वाचे असून लोकांचे हितावह कां असेनात, तथापि ते त्यास दुसरे कोणास कळवितां येत नाहींत; आणि असें झालें म्हणजे कांहीं काळानें ते सर्व विचार लयास जातात.
आज भट लोकांपेक्षा शूद्रांदि अतिशूद्र लोकांचा भरना सुमारें दसपट अधिक असून भट लोकांनी शूरादि अतिशूद्र लोकांस कसें धुळीस मिळविलें असतें? याचें उत्तर असें आहे कीं, एक शाहाणा मनुष्य दहा अज्ञानी मनुष्यांचें आपणाकडेस मन वळऊन त्यांस तो आपले ताब्यांत ठेऊं शकतो.
तीं दहा अज्ञानी मनुष्यें जर एकाच मताचीं असतीं तर त्यांनीं त्या शहाण्या मनुष्याचें कांहीं चालू दिलें नसतें; परंतु ते दहाजण निरनिराळे दहा मतांचे असल्यामुळें शहाण्या मनुष्यास त्यांस फसविण्यास कांहींच आडचण पडत नाहीं.
हा त्यांचा विचार सिद्धीस जाण्याकरितां जातिभेंदाचें थोतांड उपस्थित करून, त्यांजवर अनेक स्वहितसाधक ग्रंथ केले व ते त्या अज्ञानी लोकांचे मनांत भरविले.
त्यांचा पुर्तेपणीं सूड उगविण्याकरितां त्यांस व त्यांची जी पुढें संतती होईल तिजला त्यांच्यांतीलच लोकांनीं म्हणजे हल्लीं ज्यांस माळी, कुणबी वगैरे म्हणतात, तर त्यांनीं त्यांचा स्पर्शदेखील करूं नये असें भट लोकांनी त्यांचे मनांत भरविलें.
भट लोकांनीं आपल्याशीं इतर लोकांनीं जसजशी वर्तणूक केली त्या त्याप्रमाणें त्यांच्या जाति बांधून त्यांस सजा अथवा वरकांतिचा आश्रय देऊन सर्वस्वी आपलें अंकित करून ठेविलें.
वास्तविक विचाराअंतीं असें ठरतें कीं ब्राह्मण लोक हे समुद्राचे पलीकडेस जो इराण देश आहे त्या देशांतील मूळचे राहणारे होत. पूर्वी त्यास इराणी किंवा आर्य लोक म्हणत असत,
त्यांनीं बांधिलेल्या नेमांचा धिक्कार मागें पुढे कोणी करूं नये, या भयास्तव त्यांनीं ब्रम्ह्याविषयीं अनेक तर्हतर्हेच्या नवीन कल्पित गोष्टी रचिल्या व त्या गोष्टी ईश्वरेच्छेनेंच झाल्या आहेत असा त्या दासांच्या मनावर ठसा उमटावा म्हणून त्यांनीं शेषशाईचें दुसरें आंधळें गारुड रचिलें आणि संधि पाहून कांहीं काळानें त्या सर्व लेखांचे ग्रंथ बनविले.
दक्षिणेंत दुसरें क्षेत्र बळीच्या ताब्यांत होतें त्यास महाराष्ट्र म्हणत असत व त्यांतील सर्व क्षेत्रवासी लोकांस महाराष्ट्री म्हणत असत, त्याचा अपभ्रंश मराठे हा होय.
महाराष्ट्र क्षेत्र अतिशय मोठें असल्यामुळें बळीराजानें त्याचीं नऊ खंडें केलीं होतीं. यावरून त्या प्रत्येक खंडाच्या अधिकार्याचें नांव खंडोबा पडलें होतें,
त्यांपैकीं जेजोरीचा खंडोबा हा होता. तो आपल्या आसपासच्या क्षेत्रपतींच्या ताब्यांतील मल्लांच्या खोडी मोडून त्यांस ताळ्यावर आणीत असे; यास्तव त्याचें नांव मल्लअरी पडलें आहे. त्याचाच अपभ्रंश मल्हारी हा होय.
त्यानें कधीं आपल्यास पाठ दाखविलेले शत्रूंवर वार केला नाहीं, म्हणून त्याचें नांव मारतोंड पडलें होतें. ज्याचा अपभ्रंश मार्तंड
बळीराजानें महाराष्ट्रात महासुभा आणि नऊ खंडांचा न्यायी असे दोन मुख्य अधिकारी वसूल व न्याय करण्याचे कामांत नेमले होते.
त्या महासुभ्याचा अपभ्रंश म्हसोबा झाला आहे. तो सर्व पीकपाण्याची यथाकळीं तपासणी करून त्याप्रमाणें सूट तूट घालून सर्वांस आनंदांत ठेवीत असे. यामुळें हल्लीं मर्हाठ्यांत एक कूळ असें सांपडणार नाहीं कीं, ज्यांत ते आपल्या शिवारांतील भलत्या एकाद्या दगडास महासुभ्याचे नांवानें शेंदुराचें मांजण करून त्यास ऊद दाखवून त्याचें नांव घेतल्याशिवाय चाड्यावर मूठ ठेवणार नाहींत, शेतांत विळा घालणार नाहींत
अयोध्येजवळ काशीक्षेत्राचे आसपास कांहीं बळी राजाचे ताब्यांत क्षेत्रें होती, त्यांस दहावें खंड म्हणत असत. तेथील अधिकार्याचें नांव काळभैरी होतें म्हणून सांपडतें.
बळीराजा जेव्हां कांहीं महत्त्वाचें काम आपल्या सरदारांस सोंपीत असे तेव्हां आपला दरबार भरवून तेथें तो एका तबकांत भंडार व नारळ यांसहित पानाचा विडा मांडून म्हणत असे कीं, ज्यास हें काम करण्याची हिम्मत असेल त्यानें हा विडा उचलावा.
महावीराची शपथ घेऊन त्यांतील भंडार कपाळीं लावून नारळासहित तो पानाचा विडा उचलून आपल्या माथ्यावर ठेवून पदरांत घेई.
यावरून त्या संस्काराचें नांव तळ उचलणें हें पडलें असावें.
बळीच्या सर्व महावीरांपैकीं भैरोबा व जोतीबा व नऊ खंडोबा हे तर रयतेच्या सुखाकरितां झटण्याची शर्थ करीत असत.
याजकरितां एकंदर सर्व मर्हाठ्यांनीं हरएक शुभकार्य सुरू करण्याचे पूर्वीं तळी उचलण्याचा संस्कार करण्याचें सोडलें नाहीं.
यावरून हल्लींचे मर्हाठे म्हणजे मांग, महार, कुणबी, आणि माळी इत्यादी लोक दर
इतक्यांत अश्विन शुद्ध अष्टमीस रात्रीं बळीराजा रणांत पडल्याची बातमी तिला येऊन पोंहचतांच तिनें त्या खडड्यांतील लांकडांस आग लावून त्यामध्यें उडी घालून मरण पावली. त्या दिवसापासून सती जाण्याची वहिवाट पडली असावी असा तर्क निघतो.
विप्रांच्या कित्येक कुळांत दरवर्षी अश्विनमाशीं विजयादशमीस त्यांच्या स्त्रियांनीं कणकीचा अथवा तांदुळाचा बळी दाराच्या ऊंबर्याबाहेर करून ठेविलेला असतो, त्याचे उरावर डावा पाय देऊन ते आपट्याच्या काडीनें त्याचें पोट फोडितात; नंतर त्यास उल्लंघून घरांत शिरतात, अशी वहिवाट सांपडते.
त्याचप्रमाणे बाणासुराचे लोक अश्विन शुद्ध दशमीस रात्रीं आपल्या घरोघर गेले, तेव्हां त्यांच्या स्त्रियांनीं पुढें दुसरा बळी येऊन देवाचें राज्य स्थापील, याविषयीं भविष्य जाणून त्यांनीं आपल्या उंबर्यांत उभ्या राहून त्यांस ओंवाळून अशा म्हणाल्या कीं, “इडा पीडा (द्विजांचा अधिकार) जावो आणि बळीचें राज्य येवो.”
सर्वांची दाणादाण झाल्यास पुन:आपण आपल्या परिवारांतील एकमेकांनीं एकमेकांस ओळखून काढितां यावें, म्हणून ब्रम्ह्यानें एकंदर सव आपल्या परिवारी लोकांच्या गळ्यांत एक एक पांढर्या सुताच्या पाष्टीचें जातीसूचक चिन्ह, म्हणजे ज्यास हल्लीं ब्रम्हसूत्र म्हणतात, तें घालून व त्या प्रत्येकास एक जातीबोधक बीजमंत्र, म्हणजे ज्यास हल्लीं गायत्री म्हणतात, ती
पुढें जेव्हां ते महाअरी आपल्या शूद्र बांधवांस भटांच्या हातांतून सोडवावें म्हणून भटांवर हमेशा हल्ले करूं लागले, तेव्हां एकंदर सर्व भट, शूद्रांचा इतका द्वेष करूं लागले कीं ते शूद्र शिवलेलें अन्नसुद्धां खाईनासे झाले. व त्याच द्वेषावरून हल्लींचे भट शूद्र शिवलेलें अन्न तर काय; पण ते शूद्र शिवलेलें पाणीसुद्धा पीत नाहींत.
कालानंतर शूद्रांस आपल्या पूर्वींच्या श्रेष्ठत्वाची आठवण झाल्यास ते कधीं तरी आपल्या उरावर नाचण्यास कमी करणार नाहींत, या भयास्तव शूद्रांस मुळींच कोणी ज्ञान शिकवूं नये म्हणून भटांनी बंदी करून तृप्त झाले,
सबब ते शूद्रांचे मुलांस केवळ कामापुरतें व्यावहारिक ज्ञानसुद्धां न शिकवितां ते त्यांच्या मनांत अनेक तर्हेची अपुरतीं देशाभिमानाचीं खोटीं तत्वे मात्र भरवून त्यांस पक्के इंग्लिश राज्यभक्त, करून अखेरीस त्यांस शिवाजीसारिख्या धर्मभोळ्या, अज्ञानी, शूद्र राजानें आपला देश म्लेंच्छापासून सोडवून गाई-ब्राह्मणांचें कसें पालन केलें, याविषयीं अनेक हुलथापा देऊन त्यांस पोकळ स्वधर्माभिमानी करून सोडितात.
आतांचे ब्राह्मण भट आपलीं पोटे6 जाळण्याकरितां जप, अनुष्ठानें, जादूमंत्रविधि करून अज्ञानी माळ्यां कुणब्यांस गंडे घालून फसवितात. तथापि त्या बापुड्या दुर्दैवी हतभाग्यांस त्या ढोंगी गारुड्यांचें कपट शोधून काढण्यास फुरसतच होत नाहीं.
हें सर्व ब्रम्हकपट पुढें कधीं शूद्रांच्या ध्यानांत येऊं नये या भयास्तव, अथवा त्या ग्रंथांत पाहिजेल तसे फेरफार करितां यावेत म्हणून त्यांनीं शूद्र वगैरे पाताळीं घातलेल्या लोकांस मुळींच कोणी ज्ञान देऊं नये, असे अनुसंहितेसारिख्या अपवित्र ग्रंथांत फारच मजबूत लेख करून ठेविले आहेत.
एकंदर आपल्या सर्व ग्रंथांत फेरफार करून त्या सर्वांस मजबुती येण्याकरितां एक नवीन नास्तिक मत उपस्थित केलें; त्यास हल्लीं वेदांत अथवा ज्ञानमार्ग म्हणतात.
पण त्यांनीं संधी साधल्याबरोबर त्याच ग्रंथांतील भाकड दंतकथा सांगून एकंदर सर्व अज्ञानी लोकांच्या मनांत इंग्रजी राज्याचा द्वेष भरवून त्यांनीं या देशांत मोठमोठालीं बंडें उपस्थित केलीं नाहींत काय?
आपल्या जातीच्या धष्टपुष्ट आळशी भटांस दररोज नानातर्हेचीं मिष्टान्न भोजनें घालण्याची वहिवाट घातली. त्याचप्रमाणे त्यांच्या मतलबी ग्रंथांचे अध्ययन करणार्या भटांस यथासांस वार्षिक दक्षिणा देण्याची वहिवाट घातली.
उलटे आपल्या अज्ञानी शूद्र दात्यांस चेटकी धर्मांच्या वापीनें आपले पाय धुवून त्याचें पाणी मात्र त्यांस पाजितात.
जेव्हां ते युरोपियन उपदेशक एकंदर सर्व शूद्रास खरें ज्ञान सांगून त्यांचे डोळे उघडतील, तेव्हां ते या ग्रामराक्षसांच्या वार्यासदेखील उभे राहाणार नाहींत.
हे सर्व भटजी अठरा वर्णांचे गुरू पडले, यांनीं कसेंही आचरण केलें. तथापि शुद्रानें त्याचा तोंडानें उच्चार करूं नये, असें आपलीं शास्त्रें बोंबलतात.
एकंदर सर्व भट-खोतांनीं अमेरिकन स्लेव्ह होल्डरचा कित्ता घेऊन आपल्या मतलबी धर्मांच्या साह्यानें अज्ञानी शूद्रांस सरकारच्या उलट उपदेश केल्यामुळें, बहुतेक अज्ञानी शूद्रांनीं, उलट्या युरोपियन कलेक्टरांवर कंबरा बांधून सरकारास असें म्हणाले कीं, आम्हांवर जो खोतभटजींचा अधिकार आहे तो तसाच राहूं द्यावा, येथें
सरकारनें प्रथम भट समाजांच्या संख्याप्रमाणानें एकंदर सर्व खात्यांत भटकामगार नेमू नयेत, असे माझें मत नाहीं. परंतु त्याच प्रमाणानें बाकी सर्व जातीचे कामगार नच मिळाल्यास सरकारनें त्याऎवजीं फक्त युरोपियन कामगार नेमावेत.
आम्ही सर्व शूद्र इंग्रज लोकांचे गुरुबंधु झाल्याबरोबर त्यांच्या एकंदर पूर्वजांच्या कृत्रिमी ग्रंथाचा धिक्कार करूं आणि तेणेंकरून त्यांच्या जात्त्याभिमानाच्या तोंडांत माती पडून त्यांच्यातील तूर्त प्रत्येक ऎदी लोकांस आम्हां शूद्रांच्या श्रमाच्या पोळ्या पोत्या खावयास मिळणार नाहींत.
या सुधारल्या विद्वानांच्या पूर्वजांस स्वदेशाभिमान जर खरोखर ठाऊक असता, तर त्यांनीं आपल्या पुस्तकांत आपल्या देशबंधु शूद्रांस पशूपेक्षां नीच मानण्याजोगे लेख करून ठेविलेच नसते.
ते विष्ठा खाणार्या पशूंचा गोमूत्र पिऊन पवित्र होतात; परंतु ते शूद्राचे हातचें स्वच्छ कारंजाचें पाणी पिण्यास अपवित्र मानितात.
अरे, एकंदर सर्व मर्हाठी वर्तमानपत्रांचे कर्ते भट असल्यामुळें त्यांच्यानें आपल्या जातीच्या लोकांच्याविरुद्ध लिहिण्यास हातच उचलवत नाहीं.
चांगलें काम शेवटास नेण्याकरितां वाईट उपाय योजूं नयेत,

