Kindle Notes & Highlights
हा प्रचंड आवाज लहानपणापासून त्याच्या स्थलांतराशी जखडला गेला आहे.
कधीतरी पूर्वी खानदेशात मेंढ्या चारणारे मर्द पूर्वज तलवारी घेऊन होळकरांबरोबर सातपुडा ओलांडून उत्तरेत गेले, पराक्रम केले. आता म्हाताऱ्यांकडून त्या गोष्टी ऐकणं फक्त राहिलं.
आम्ही इतके शिकलेले आधुनिक तरुणसुद्धा ह्या देशातल्या पुरातन संस्कृतीच्या अँटेनीसारखे आहोत. ही सनातन संस्कृतीच नवं ज्ञान चाचपून घेण्यासाठी आमचा वापर करून घेते आहे. आम्ही सगळे बुद्धिवादी विचारवंत ह्या प्रचंड लोकसमुदायाच्या गतीमधील प्रायोगिक बळीसुद्धा ठरू. आम्ही निव्वळ अँटेना आहोत, निव्वळ झुरळाच्या मिशा.
आपले पूर्वज पराक्रम करायला ह्या नद्या आणि पर्वत ओलांडून वर गेले, तर आपण या भाषेच्या बंधामुळे परत इकडे ह्या चिखलात धडपडायला आलो.
ब्राह्मण, मराठा, महार- सगळ्या जातीयतेतून पोळून निघालेला हा एक धनगर प्राध्यापक.
अर्थात् मी लोकशाहीचा कट्टर पुरस्कर्ता आहे. लहानपणी मेंढरं चारणारं माझ्यासारखं छप्पन्न पिढ्या विद्येचा स्पर्श नसणारं पोरगं आज प्राध्यापक होऊन स्वतंत्र विचार करू शकतं ही किमया ह्या गुलामी देशात लोकशाहीमुळेच झाली मालक.
भोळे म्हणाला, माझा राजसत्तेवर अतोनात विश्वास आहे. दोनशे साहित्यक आणि विचारवंत करू शकणार नाहीत इतकं एखादा नेपोलियन किंवा केमाल पाशा करून टाकतो.
पण करायचं काहीच नाही आणि फक्त लोकशाहीच टिकवत राहायची असं भोंगळ सरकारसुद्धा देशाला खड्ड्यात टाकतंच. आपल्याला धडाक्यानं काहीतरी केलं पाहिजे. वेग पाहिजे मालक, वेग. अॅक्शन.
आमचे पूर्वज शेतांवर खतासाठी मेंढ्या बसवायला म्हणून ह्या गावाहून त्या गावी असे हिंडायचे. त्यांच्यात आणि आपल्यात तसा काही फरक नाही म्हणा की.
इथे पुराणिकमधे च्यायला इतकी कामं पाठीमागे लावून देतात, पुन्हा इतक्या चर्चा करतात माठूराम वगैरे लोक की बोअर व्हाल तुम्ही! एकदिवसाआड स्टाफ मिटिंगा घेऊन जगात शांती कशी प्रस्थापित होईल याच्यावर रात्ररात्रभर प्राध्यापकांना बोअर करतात साले. पण इलाज नाही. निव्वळ ब्राम्हणी वाद. निष्कर्ष शून्य. तुका म्हणे वादे-वाया गेली ब्रम्हवृंदे!
जिथे त्यागाला महत्त्व असतं अशाच समाजात त्याग वगैरे ठीक असतो. एरवी तुम्ही फक्त त्याग करत राहावा आणि तुमची नोकरी गेल्यावर तुमची बायकापोरं रस्त्यावर भीक मागायला लागली तर कोणी एक दिडकीची मदत करणार नाही.
तिकडे पोरगेलं गोरंपान ते जोशी. लई रोम्यांटिक है ते. रोम्यांटिक जोशीच म्हंतात त्येला.
आम्ही साले आज माठूराम आणि ऋग्वेदी या दोघांच्या तावडीत सापडलो स्टाफरूममधे! साले फुकट येऊन बसतात आणि सापडेल त्या प्राध्यापकाला डेमॉक्रसीबद्दल तुमचं काय मत आहे आणि एज्युकेशनबद्दल तुम्हाला काय वाटतं असले प्रश्न विचारत बसतात चारचार तास. साल्यांना दुसरे उद्योगच नाहीत. दुसऱ्या कुठल्या कॉलेजात नसेल बाबा असला ताप.
बाहेर मराठी सिनेमातल्यासारखा पाऊस पडायला सुरुवात झालीय. वाढायच्या आत पळालं पाहिजे.
प्रत्येक गावात आपल्या विचारांचे चार लोक असतात याचं त्या सगळ्यांनाच फार समाधान वाटत होतं.
चांगदेव म्हणाला, ते चांगलं. आपल्यात कधी पूर्वी हा इंग्रजी व्यक्तिवाद अस्तित्वात नव्हता. एकदम इंग्रजांनी इथे व्यक्तिवाद आणला आणि सगळं समाजाचं स्वास्थ्य बिघडून गेलं.
इतक्या गुलामगिरीत ह्या देशात बायकांना वागवलं जातं एवढ्या एका मुद्दयावरून सुद्धा हा देश शहाण्या माणसांनी सोडून द्यावा.
सुधारणांचा अव्याहत भडिमार आणि त्या राबवून घेणारं कणखर सरकार आलं पाहिजे, असं आपलं मत आहे. नाहीतर ह्या देशात लोकशाही टिकत नाही मालक.
अभिनय खरं तर एकमेव जिवंत कला आहे. अभिनय, नाट्य सगळीकडे लागतंच. तुमच्या टूरिझमच्या कोर्समधेही गाईड्स्ना अभिनय लागतो. तो पहा एक तरुण मुलगा हाटेलच्या मागच्या दारात उभा आहे. त्याची नेहमीची पोरगी अजून रेस्टराँमधे पावसामुळे आली नाही. अगदी नाटकातल्या प्रवेशासारखंच जग वाटतं आहे की नाही त्याला? निदान आपल्याला तरी तो नाटकातल्यासारखा वाटतोच आहे. आपला
पुस्तकांखाली ठेवायला म्हणून त्याला वर्तमानपत्रांची रद्दी हवी होती. भोळे वर्तमानपत्र वाचत नसल्यानं घरात नाहीत हे त्यानं सांगितलं तेव्हा चांगदेव एकदम त्याच्यावर खूष झाला.
माणसाची सुद्धा ह्या समाजात किंमत राह्यली नाही तिथे तुमच्या त्या कल्पनांची काय किंमत असणार?
तो म्हणाला, माझी उमेदीनं जगण्याची इच्छा कमी होता कामा नये. दगदग नाही सांगितली होती. तंबाखू, खूप चहा नाही सांगितला होता. काळजी तर विषासारखी हेही माहीत होतं. ती त्या वेळची हास्पिटलं. ती वर्षं. ऐन उमेदीत खाक झालेले विशीतीले दिवस. एकट्यानं सापासारखं जवळ बाळगलेलं दुःख. सगळं आठवून तो हादरून गेला. पायाखालची जमीन निसटून चाललीय असं वाटलं.
शरीर थकलं की आपोआप मनही थकून जातं. त्यासारखं दुसरं समाधान नाही. मन थकलं की भलते भोवरे मनात तयार होत नाहीत. भोळे म्हणाला, पण एवढ्यावर तुमच्यासारख्या तरुण माणसानं थांबावं असं मला वाटत नाही. शरीराला आणि मनाला थकवणारं काहीतरी असलं पाहिजे, पण काही तरी चांगलं करायचंही एक मनात असलं पाहिजे. त्याशिवाय जगण्यात काही पॉइंट नाही. चांगलं म्हणजे आपल्या दृष्टीनं जे काही चांगलं असेल ते-पण तसं काहीतरी पाहिजेच.
कसलं स्वतः होऊन स्वातंत्र मिळवणार हो असल्या बायका? तिकडे युरोपात बारक्याबारक्या हक्कासाठी लोकांनी अतोनात त्याग केले, आयुष्यं बरबाद केली, कुर्बान्या केल्या म्हणून त्यांच्या समाजात आताआता हे व्यक्तिस्वातंत्र्य आलं. ते जसंच्या तसं काही कवडीची तोशीस लागू न देता ह्या शहरी लोकांनी इकडे अनुकरणानं उचललं. मला असल्या फॅशनेबल स्वातंत्र्याबद्दल काहीच आस्था नाही. इथल्या ह्याच आपल्याच समाजात सगळ्या अंगांनी जे मिळवता येईल ते खरं, कायम टिकणारं होईल. आपण वृत्तपत्रस्वातंत्र्यासाठी काय त्याग केले? आयतं इंग्रजांकडून घेतलं आणि आता त्यात सगळे जातीय हिंदुत्ववादी घुसून बसले. काय उपयोग?
तो अंथरूण धरून पडला तेव्हा मी एकटा होतो. शेजारीपाजारी म्हणाले, तुलाही संसर्ग होईल. तू घरी निघून जा. निदान गावात रहायला जा. प्रत्यक्ष भाऊ मरायला टेकला आहे आणि आपण जाऊन पाहूसुद्धा नये, लांबून चहाकॉफी ठेवून निघून जावं हे मला सहनसुद्धा होईना. झाला तर झाला आपल्याला कॉलरा. माणूस टाळून असं मरतुकडं जगण्यापेक्षा न जगलेलं चांगलं. करायचं काय तसं भेकड जगून? पण भाऊ दोन दिवसांत मेला. माझ्याकडे प्रेमानं पहात डोळे मिटून मेला. मला तो क्षण ज्यास्त मोलाचा वाटतो. अजून त्याची पत्रं वाचली की मला अभिमान वाटतो. निव्वळ स्वत:पुरतं स्वातंत्र्य मिळवायची तुमची कल्पना मला पटत नाही.
याज्ञिक म्हणाले, मला तर एकजण परवा म्हणाला शाहू कॉलेजातला की तुमचे माठूराम कुणाचं तेरावं असो का कुणाकडे बारसं असो-अध्यक्ष व्हायला तयार! तरी बिचाऱ्याला व्हाईस-चॅन्सलर कोणी करत नाही.
गोलमाल बोलायचा पूर्ण कंटाळा आल्यावर भल्ला म्हणाला, सो डिअर लर्नेड कलीग्ज! शाल आय टेक योअर कन्सेन्ट फॉर ग्रॅण्टेड? संसाराचा गाडा ओढणारी, बहिणीच्या लग्नासाठी हुंडा जमवणारी, लहान भावांना शिकवणारी आणि एक तारखेच्या पगाराचं वारंवार अंदाजपत्रक करणारी ही विचारवंत प्राध्यापक मंडळी विरोध करायला गांगरून गेली. कोणी बोलेना. जो
माकडासारखे आपण ही फांदी मोडली तर दुसरीवर उडी घ्यायची, तीही मोडतेय म्हणून पुन्हा वरची घ्यायची असं करत करत इथपर्यंत आलो आहोत. पण केव्हातरी फांदी मोडून आपण कोसळणार हीच परिस्थिती कायम आहे. कठीण आहे.
दृश्य पद्धतीनं चांगलं वागणं हे व्यापारी वृत्तीच्या लोकांना आवश्यकच असतं. म्हणून तर इंग्रज मॅनर्स वगैरेचे स्तोम माजवतात. सॉरी वगैरे शब्द शोधून काढणारे ते लोक किती व्यापारी असतील कल्पना करवत नाही.
महारांनी संघटित व्हावं, विचारी व्हावं, प्रगती करावी म्हणून ते अहोरात्र काम करायचे. त्यामुळे त्यांच्या जातीतल्या राजकीय पुढाऱ्यांचं आणि त्यांचंही जमत नसे. ते दर सुटीत गावाकडे जाऊन तिकडच्या गरीब महारांना इकडे चंबूगबाळ्यासकट घेऊन यायचे. आणि गावात जिथे कुठे मोकळी जागा सापडेल तिथे सरळ त्यांना झोपडपट्टी वसवायला सांगायचे. कुठे म्युनिसिपालटीनं बागेसाठी जागा राखून ठेवलेली असली की हे म्हणायचे, बांधा इथे झोपड्या. बागा पाह्यजेत भडव्यांना! भरून टाका ही सगळी जागा! ह्यासाठी त्यांनी दोन महार वकीलही खास झोपडपट्टीवाल्यांचे प्रश्न सोडवायला नेमले होते. मेघे म्हणजे फार तरुण वयातच पावरफुल पुढारी होऊन बसले होते.
...more
लघ्वी केल्यासारखं शिकवायचं. घंटा झाली, वर्गात पोरांसमोर तोंड केलं की सुरू! घंटा झाली की मोकळं.
भोळे म्हणाला, तुमचं ठीक आहे देशपांडे, तुमच्यासारख्या लोकल माणसांना काहीही करता येतं. आमच्यासारख्या उपऱ्या माणसांना हे स्वातंत्र्य नसतं. आम्हाला ढोरमेहनत करूनच आमचं अस्तित्व सिद्ध करावं लागतं. तसा मी सुद्धा सुरुवातीला तिकडे असाच वागायचो. पण नंतर माझ्या लक्षात आलं की जोपर्यंत तुम्ही ह्या जगन्नाथाच्या रथाच्या गर्दीत स्वत: होऊन घुसत नाही, रथ ओढत नाही, तोपर्यंत तुमच्या विचारांनाही कोणी किंमत देत नाही. नाहीतर वावदूक समजतात तुम्हाला हे गाढवकाम करणारे.
मागे पोरं पोरींकडे आणि पोरी पोरांकडे मोठ्या प्रमाणावर पाहापाही करून आपल्या व्यक्तित्वाचा बसल्याबसल्या आविष्कार करायचे सर्व मार्ग अवलंबून गलबलाट करत होती.
माठूरामचं भाषण संपल्यावर मुख्य पाहुणे बाबासाहेब जोशी इंग्रजीतून बोलायला उठले. दाहेक मिनटं जोरात सोशालिझमवर इंग्रजी बोलून झाल्यावर मग मुद्दा नसतांना ते निव्वळ इंग्रजी बोलत राह्यले. मधे एकदा काय झालं तर इंग्रजी बोलता बोलता ते एकदम मराठी शब्द बोलून गेले.... पावर इज इन द हॅन्ड्स् ऑफ द करप्ट... म्हणून... त्यांनी मधेच म्हणून असं म्हटल्याबरोबर पोरंही म्हणून! म्हणून! करत ओरडली.
हळूहळू चांगदेवच्या लक्षात आलं की, तो लक्ष देऊन वाचूनही येत नव्हता. एवीतेवी पोरं ऐकतच नाहीत तर वाचून जाच कशाला ह्या मुद्यावर तो हल्ली आला होता. त्याला एकदा पोरांनी फादरचं स्त्रीलिंग विचारलं तेव्हा यानं झटकन फादरेस सांगितल्यापासून कायम गोंधळ सुरु झालं होता.
एकदा भल्लानं त्याला गुड मॉर्निंग केलं तर हा थांबून घड्याळात काळजीपूर्वक पाहून भल्लाला म्हणाला, मला वाटतं आता पी.एम्. सुरू झालं आहे! गुड आफ्टरनून! मग स्टाफमधे येऊन चांगदेवला आणि चांगल्या देशपांडेला तो म्हणाला, भल्लाची मस्त चूक काढली! माझ्या इंग्रजीवर बोलतो भडवा! जी ए एन् डी वर एल् ए टी एच् घातली पाहिजे साल्याच्या. सी एच यू टी वाय् ए आहे!
आणि तो बुटका कुलकर्णी तर कॅज्युअल लीवचा अर्जसुद्धा कसा लिहितो माहीत आहे?... आय वॉन्ट कॅज्युअल लीव बिकॉज आय एम गोइंग ऑन कॅज्युअल लीव! अशांनीसुद्धा मला इंग्रजी येत नाही म्हणावं!
आपल्या गोऱ्या रोमँटिक जोश्यानं एकदा कॅज्युअल लीवचा अर्ज कसा केला होता माहीत आहे?... देअर इज ए हेडेक इन माय स्टमक, देअरफर ग्रँट मी कॅज्युअल लीव...
लग्नात बारा हजार रुपये हुंडा घेतलेला हिंदुत्ववादी कुलकर्णी म्हणाला, इंग्रजी भाषाच अशी अडाणचोट आहे की हे असंच चालणार.
ही शिक्षणपद्धती म्हणजे देशातल्या तरण्याबांड पोरांना हिजडे बैल बनवणारी धूर्त युक्ती आहे.
भ्याडांचं काम तेच शौर्य म्हणून आपल्याला करत राह्यलं पाह्यजे! याच्यातून सुटकाच कुठे आहे?
शेंडेनं एक मजेदार गोष्ट सांगितली: आपले क्षीरसागर काल तीन तास शिकवून पुरे थकले आणि संध्याकाळी चौथ्या तासाला थर्ड इअरच्या वर्गावर गेले. अर्धाच तास बडबडून कंटाळा आल्यावर ते उगाच मुलांना म्हणाले, तुम्हीसुद्धा काही रिस्पॉन्स दिला पाह्यजे, प्रश्न उपस्थित केले पाह्यजेत, चर्चा केली पाह्यजे. मीच वर्गात का म्हणून एकटं बोलत रहावं? तर वर्गातलं एक पोरगं ओरडलं, कारण तुम्हाला पगार दिला जातो! क्षीरसागर बिचारा आधीच नर्व्हस माणूस, पार खलास झाला काल!
पहिल्या आठवड्यात कुतूहल म्हणून विद्यार्थी खूप गर्दीनं हजर राह्यले. पण कोणत्याही प्राध्यापकामागे कोणतेही सत्तर विद्यार्थी लावून दिल्यामुळे नावगाव ओळीनं विचारण्यापलीकडे कोणाला काय बोलावं हे कळेना. विद्यार्थीही गप्प बसून राह्यले. काही प्राध्यापकांनी विनोद सांगितले. काहींनी ह्या योजनेची टिंगल सुरु केली. गंगातीरकरनं तर इंग्रजी कसं सुधारावं ह्यावर लेक्चरच सुरु केलं-त्यामुळे त्यानंतरच्या बैठकीला एकही मुलगा हजर नव्हता. शेंडे तर मुलांवर ओरडला, अरे तुमची मनं समजावून घ्यायचीत! बोला बे!
त्यातला लहान मेंदू मोठा व मोठा मेंदू लहान दिसणाऱ्या डोक्याचा देशपांडे नावाचा एक म्हातारा भोळेला म्हणाला, काय भोळेसाहेब, तुमच्यासारखा विद्वान माणूस... साठ वर्षं झाली म्हणून काय त्याची विद्वत्ता संपते का? भोळे हसून म्हणाला, मला साठ वर्षं झाल्यावर तुम्ही मला इथे ठेवणार की नाही हे आधी सांगा म्हणजे मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन. माठूराम भोळेकडे संशयाने पहात म्हणाले, भोळेसाहेब हा तत्त्वाचा प्रश्न आहे. व्यक्तीचा नाही. मी कुठे म्हणालो व्यक्तीचा आहे? मी ब्राह्मण नाही म्हटल्यावर तुम्ही मला साठीनंतर काढणार आणि चुळबुळे तुमचा माणूस म्हणून त्याच्यासाठी तुम्ही कंबर बांधायला निघाले असा तुमच्यावर कोणी आरोप
...more
चांगला देशपांडे म्हणाला, ह्याला निश्चित इंग्रजीची डिग्री नसावी. परवा सी मी बिफोर आफ्टरनून अशीच मला चिठ्ठी पाठवली! बिफोर आफ्टरनून म्हणजे काय? इंग्रजीचा हेड हा. कमाल झाली. बाराशे रुपये पगार घेतो भडवा फुकट. खरवंडीकर म्हणाला, मोनोलॉग शिकवतांना हा काय म्हणाला, ए मोनोलॉग इज अ डायलॉग बिटवीन वन पर्सन ओन्ली! हि हि हि हि हि! चांगदेव म्हणाला, मला वाटलं भल्ला आधी तिकडे पाकिस्तानात ड्रायव्हर असावा. वाटतं ना तसं?....शरीर वगैरे ड्रायव्हरसारखंच आहे, पण त्याच्या तोंडात गिअरमें ले लिया, बॅटरी चार्ज करके आव, अॅक्सिलेटर मत दबाव असं येतं नेहमी.
प्राध्यापक अवचट शिकवण्यात फार वैताग असल्यामुळे विद्यार्थ्यांना ते जातात याचा आनंद झाला होता. पण ते जाणार नाहीत म्हटल्यावर वर्गातले क्लेश चालू रहाणार या धास्तीनं त्यांनीही अवचटांना पाठवलंच पाहिजे ह्या काही कम्युनिस्ट विद्यार्थ्यांनी काढलेल्या पत्रकाला भरघोस पाठिंबा दिला.
वेळ आली तर परशुराम, कधी वामनराव होऊन हानामारी करायला कचरत नाही ब्राह्मन. असे हे ब्राह्मन अन् मराठे आमच्या दलित महारांना आपल्यात सामावून नवा समज करतील, ह्यासारखं विनोदी स्वप्न दुसरं नाही.
ब्राम्हणच काय पण सबंध हिंदूधर्मच बंदिस्त आहे. मोठमोठे लोकसमूह हिंदू होऊ शकले पण एकटादुकटा परका माणूस हिंदू होऊच शकत नव्हता पूर्वीसुद्धा. आता तर हिंदूधर्म संपूर्ण मेला आहे. कोणालाच हिंदू होता येत नाही. उलट शीख आणि जैन आणि लिंगायत हे स्वतःला हिंदू म्हणायला तयार नाहीत. जे दुरावले त्यांनाही परत आत घेता आलं नाही असा हिंदुधर्म आहे. निव्वळ प्रेत म्हणून त्याची व्यवस्था पहावी लागते आहे. हिंदुधर्म गाडून टाकल्याशिवाय ह्या देशात नवा समाज निर्माण होणार नाही.
शेंडे म्हणाला, ते काही सांगू नका राव. महारांची पोरं सुरुवातीला नवबौद्ध म्हणून अभिमानानं आपण हिंदू नाही म्हणून सांगतात, नंतर सरकारी मदत मिळवायच्या वेळी कंसात महार लिहितात. नंतर शिकलेली पोरं साहेब झाली की आर्थिक फायदे संपले म्हणून पुन्हा जातीचं हित विसरायला लागतात.
चांगदेव म्हणाला, पण याचा अर्थ आपल्या देशांत कायम समाजसुधारक जन्मत रहाणार आणि आपण कायम असेच राहून त्यांच्या जयंत्या साजऱ्या करत रहाणार! ज्या देशात जास्त संत आणि समाजसुधारक तो देश मूर्ख लोकांचा असं म्हणायला हरकत नाही.