Kindle Notes & Highlights
चांगदेव म्हणाला, मेघेसाहेब अशी ज्या त्या जातीची डबकी बांधण्यापेक्षा सगळ्या मराठी समाजानं एक मोठा समुद्रच का उभारू नये, ज्यात सगळ्यांना आपापलं स्वातंत्र्य उपभोगता येईल? ब्राम्हणी साहित्याचे निकष धुडकावून दलित साहित्याचे निकष पुढे आणण्यात मला काहीच कर्तबगारी वाटत नाही. शेवटी ज्ञानेश्वरी न् दासबोध कुठल्याही मराठी माणसाला टाळता येणार नाही.
आधी सुखवादी-भोगवादी समाज तयार होतो, मग त्यातून ध्येयवादी त्यागी माणसं निर्माण होतात.
दुसरा विद्यार्थी म्हणाला, ट्रक चालवायला काय शिकता राव? त्यापेक्षा उंट चालवायला शिका. सगळा हिंदुस्थान सहारासारखा कोरडा होतो आहे. लवकरच आपल्याला वाळवंटात रहावं लागेल.
तिकडे एक वयस्क गृहस्थ जेवता-जेवता एकदम म्हणाले, अमेरिकेत घोडे खातात गाजरं. आणि हा गहू डुकरांना देतात. आपण घोडी अन् डुकरं व्हायच्या काबिल आहोत झालं.
चालतांना हवा चिरत जाणं जितकं सोपं तितकं हे जगणं सोपं झालं.
कॉलेजात आल्या आल्या इंग्रजी पेपर बळकावून दिवसभर वाचत बसणाऱ्या इतिहासाच्या कुलकर्ण्यांनी वारंवार दिवाळीच्या फराळाला या म्हणून म्हटल्यानं भोळे आणि चांगदेव एका संध्याकाळी त्यांच्याकडे गेले. त्यांनी दिवाणाखान्यात सतरंजीवर बैठक मारली होती आणि चाऱ्ही बाजूंना युनिव्हर्सिटीच्या पेपरांचे ढीग रचलेले होते. कुलकर्णी अधूनमधून पेपरावर बरोबरच्या खुणा सपासप करत वरतून चांगदेवाशी बोलत पेपरामागून पेपर उचलत संपवून फेकत होते. लगेच कुलकर्णींबाई चष्मा वारंवार वर करत नवऱ्यानं खास तिच्यासाठी कोरा ठेवलेला एक प्रश्न तपासून बेरजा करून पेपर संपवून गठ्ठयावर नीट ठेवून देत होत्या.
ठोसर म्हणाले, तुम्हाला ब्राम्हणांच्या शाळांमधे मुलं घालावीशी वाटतात, तुम्हाला आमची संस्कृती पाहिजे पण आम्ही नको! ब्राम्हणांचे उच्चार तुम्ही शिकता, ब्राम्हणांचं वळण, ब्राम्हणांची रहाणी तुम्हाला हवी, पण ब्राम्हण मात्र नको! भोळे म्हणाला, तुम्ही आपण होऊन दुसऱ्यांना हे दिलं असतं इंग्रजांसारखं तर हा ब्राम्हणव्देष जन्मालाही आला नसता. असं इतिहासात-पुराणांत एकही उदाहरण नाही की ब्राम्हणांनी आपली विद्या शुद्रांचा उद्धार व्हावा म्हणून उदार मनानं दिली. उलट तुम्ही ती मतलबीपणानं कुलपात ठेवून सडू दिली आणि देशाला खड्डयात घातलं.
तुम्हाला फक्त ब्राम्हणांचीच गरिबी तेवढी असह्य वाटते. बाकीच्या जातींची गरिबी तर तुम्ही कथाकादंबऱ्यापासून गृहीतच धरलेली आहे. किती गरीब कोळी, माळी, शिंपी, सोनार, महार, कुणबी हुशार असून मागे रहातात, याची तुम्हाला दखलही घेववत नाही. जणू काही प्रत्येक गोष्ट मिळणं हा फक्त ब्राम्हणांचाच अधिकार आहे. सगळ्याच गरीब बुद्धिमान पोरांबद्दल बोलत जा. आणि ह्या संघवाल्यांनी गोवधबंदीचं कसलं आंदोलन सुरू केलं आहे? तुम्हा ब्राम्हण मंडळींना नुसत्या गायी पाळा म्हणायला काय जातं? कोणते ब्राम्हण गायी पाळतात? दाखवा बरं एक तरी? म्हणजे गायी म्हशी पाळणारे कुणबी लोक बिचारे शेणामुताच्या वासात गोठ्यापाशी रहाणार! आणि तुम्ही
...more
आपल्या श्रद्धा म्हणजे ब्राम्हणी श्रद्धा निव्वळ नकोत. वारकरी, महानुभाव यांच्याही श्रद्धा ब्राम्हणांनी थोड्याशा जवळ घ्याव्या. भेदाभेद नको, स्त्रीपुरुष यांच्यात आर्यसंस्कृतीइतकं अंतर नको-हेही ब्राम्हणी पक्षांनी पुढे मांडावं. निव्वळ गायी आणि वेद हेच नको. ह्या बहुतेक संघवाल्यांची मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये जातात. स्वभाषा मात्र नको पण देशाभिमानाचं स्तोम दुसरीकडे. विचारा भोपटकरांना, तुमची मुलं कुठल्या शाळेत जातात हो? कॉन्वेंटमधे-त्याचं कारण— कारण सांगू नका. तेवढं पुरे आहे!
इतकं शिकल्यावर पुरुषाइतकीच नोकरीची पात्रता असतांना अडाण्यासारखं बसून रहाणं काही चांगलं नाही. कुटुंबाचं पोट भरण्याचं समाधान आता बायकांनाही मिळू द्या की. नोकरीमुळे स्वतंत्र असल्याची स्वाभिमानाची जाणीव बायकांना होते. खरं म्हणजे नवऱ्यांनीच बाहेर ढोरकाम करून थकून यावं आणि बायकांनी घरात आराम करावा हा मध्यमवर्गी पॅटर्न पुरुषांनीच मोडला पाह्यजे!
कर्कोटक चावल्यानंतर नल कायम बाहुक नावाचा कुरूप सारथी, स्वैंपाकी म्हणून वावरतो हे अत्यंत ग्रेट आहे. असं कर्कोटकानं चावून सबंध कायापालट करून टाकणं ग्रेट आहे. त्यावेळी आपलं विकृत स्वरूप पाहून नलाला फार वाईट वाटलं. तेव्हा कर्कोटक नलाला म्हणतो, तुला लोकांनी ह्या विपन्नावस्थेत ओळखू नये म्हणून मी असं केलं आहे. ज्या दुष्ट कलीनं तुला अशा घोर संकटात ढकललं आहे तो तुझ्या शरीरात रहातो आहे. माझ्या ह्या भयंकर विषानं त्याला तुझ्या शरीरात असह्य वेदना होतील. हे नला, असले क्लेश भोगायला सर्वथा अयोग्य अशा निरपराध तुला ज्या कलीनं अशा परिस्थितीत ढकललं, त्याच्यापासून मी तुझं रक्षणच केलं आहे. आता तुला कशापासूनही भय
...more
शेंडे म्हणाला, ह्यानं ब्लॉक मात्र असा लावून ठेवलाय की फक्त बायकोच तेवढी नाही! अगदी पोळपाट-लाटण्यासकट सगळं तयार! डबल खाट वगैरे जय्यत!
आपले कुलकर्णी नवराबायको स्कुटरवरून नेहमी येतात जातात, अय्यरबाईंचा नवराही विद्यापीठात जाता जाता स्कूटरनं तिला कॉलेजवर सोडून जातो तर चिपळ्याला पुढे नवरा आणि मागे बायको हे स्कूटरवरचं नेहमीचं दृश्य पाहून उगाच संताप येतो! म्हणतो, पहा कसे शंकरपार्वती कायम नंदीवर असतात तसेच दिसताहेत साले! पुराणात विष्णू आणि लक्ष्मी कायम गरुडावर तसे हे स्कूटरवर कायम बरोबर! कदाचित आताच्या व्हेस्पा-लँब्रेटासारख्या नंदी, गरुड वगैरे नावाच्या स्कुटरीच असाव्या त्या काळात! हॅ हॅ
भोळे म्हणाला, निव्वळ खोट्या बातम्या मालक! ह्या भटांच्या वर्तमानपत्रांवरून पूर्वी पुराणं कशी लिहिली गेली हे लक्षात येतं.
भोळे एकदा मित्रांना म्हणाला, आपल्या हिंदू संस्कृतीत अशा एकाएकी कोसळलेल्या माणसांची काहीही व्यवस्था नाही. नशीब इंग्रजांनी हास्पिटलं इथे बांधली. ख्रिश्चन धर्माची एवढी तरी ओल ह्या समाजाला लागली. इथे जात, धर्म, वंश काही न पाहता निव्वळ माणूस आहे एवढं पाहून कोणालाही आत येता येतं.
भोळे म्हणाला, आपण नेहमी ऐकतो अमुक बाई स्टोव्हनं भाजून मेली, अमुक बाईनं स्वतःला पेटवून घेतलं, तमुक स्त्रीनं जीव दिला. हे सगळे अत्याचार असतात, खून असतात. पण देशभर आपल्याला न कळणारं किती भयंकर प्रमाणावर चालत असेल? दुःखाची नोंद घेण्याचीसुद्धा परंपरा आपल्यात नाही.
पुरात वहात वहात माणसं जवळ येतात, दूर जातात...यथा काष्ठं च काष्ठं च...
जरा पोरगं बिनचूक इंग्रजी वाक्य बोललं की बाप खूष व्हायचा. तेव्हा भोळेनं नेहमीप्रमाणे मातृभाषेतूनच शिक्षण द्यावं असा बोध सुरु केला. त्याबरोबर माईणकर गृहस्थ भडकून इंग्रजीच्या महत्त्वावर बोलत राह्यला. इंग्रजीमुळेच सरोजिनी नायडू, जवाहरलाल नेहरू वगैरे जगविख्यात लेखक झाले असंही तो म्हणाला. भोळे म्हणाला, कोण म्हणतं हो त्यांना जगविख्यात? हिंदुस्थानाबाहेर कोणी विचारत नाही ह्यांना. आपले जगविख्यात लेखक म्हणजे मातृभाषेतून लिहिणारेच आहेत तुकाराम, बंकिम, प्रेमचंद वगैरे.
शेंडे म्हणाला, कवितेबद्दल तर बोलूच नको गंग्या. कोणी कवितेबद्दल गंभीर विचार करतो असं मला वाटत नाही. निव्वळ विदूषकी करून सगळे प्रसिद्ध कवी जगताहेत. चार मित्र वा वा करतात याच्या पलीकडे कवितेला काही अर्थ राह्यला नाही. कुठेतरी उकिरड्यावर सापडणाऱ्या शेकडो रानफुलांसारखं कवींचं झालं आहे.
भोळे म्हणाला, आता मला तसं तातडीनंच विचारप्रधान पुस्तक लिहायचं होतं भारतीय लोकशाहीच्या भविष्याबद्दल. पण लक्षात आलं आहे की फुकट ओढाताण करून बायकोला मुलासकट माहेरी पाठवून, नोकरीची फालतू कामं सांभाळून, पुन्हा शिकवायची न् अभ्यास करायची दगदग वेगळीच-तर असं सगळं करून सुटीत परीक्षेच्या पैशाला चाट देऊन बैठक मारा, जाग्रणं करा, सिग्रेटीमागून सिग्रेटी प्या, चहामागून चहा प्या, तासातासानं तंबाखूचा तोबरा द्या-असं रात्रभर करा! उगा म्हणता म्हणता टी.बी. न् कॅन्सर झाला तर औषधापुरतेसुद्धा पैशे ह्या भारतीय लोकशाहीच्या पुस्तकामधून मिळायचे नाहीत! करू सावकाश पुरं. त्याआधी लोकशाही गडगडली नाही ह्या देशातली तरी पुरे.
असले एस्टॅब्लिशमेंट न् अॅन्टि-एस्टॅब्लिशमेंटसारखे भोंगळ शब्द पुन्हा वापरू नकोस. म्हटलं तर सगळंच एस्टॅब्लिशमेंट असतं म्हटंलं तर काहीच नसतं.
चिपळूणकर म्हणाला, म्हणजे आईबापांनी जुळवलेली लग्नंही सुंदर समजतोस का तू अजून? भोळे म्हणाला, तेच सांगतोय मी की आपण सगळ्या पाश्चात्य कल्पनांनी आपले व्यवहार पहायला लागलो की काहीच सुंदर वाटणार नाही. आपलं बोटांनी जेवणसुद्धा सुंदर वाटणार नाही! आणि कुठलीही युरोपियन बायको कोणी केली की ती कितीही कुरूप असो, आपण रोम्यांटिकपणानं ते सुंदर समजतो. कुठलाही परदेशी चेहरा आकर्षक वाटतो!
भोळे म्हणाला, असं तपासत तपासत गेलं तर मुळात हिंदुस्थानात दहावीस कुळंसुद्धा प्युअर ब्राम्हणांची सापडायची नाहीत. सगळ्या धूर्त लोकांनी अर्ज करूकरू ब्राम्हण होऊन घेतलं असेल ब्राम्हनिझम्च्या चलतीत! गंगातीरकर म्हणाला, आता काही दिवसांनी महारांचं राज्य आलं तर ह्या सगळ्या बदमाश जाती स्वतःला महार म्हणवून घेतील!
गंगातीरकर कधी नीट इंग्रजी न बोलणारा, तोही संतापाच्या भरात एकदोन वाक्यं बिनचूक इंग्रजी बोलून गेला.
उदाहरणार्थ, माठूराम वगैरेंनी असं ठरवलं की यंदा लवकर अभ्यासक्रम संपवू नये, कारण मार्चच्या सुमारास आंदोलन करायचं असल्यामुळे विद्यार्थी आपापल्या घरी निघून जाता कामा नये. त्या सुमारास विद्यार्थी लागतील.