More on this book
Community
Kindle Notes & Highlights
“प्रत्यक्ष कृती घडली की ती कशी घडली ह्याची कारणं आपण शोधू लागतो. कधी स्वतःच्या समाधानासाठी. कधी समर्थनासाठी. इतरांना सुचत नाही, असं नाही. ज्यांना नुसतंच सुचतं ते फक्त आयुष्यभर ‘मला हेच म्हणायचं होतं’ असं म्हणत राहतात. सुचल्यावर जे त्याच्यावर चिंतन करतात पण कृती करत नाहीत ते सगळे फिलॉसॉफर्स. आणि जे कृती करतात ते संत.”
‘आपत्ती पण अशी यावी की, त्याचाही इतरांना हेवा वाटावा, व्यक्तीचा कस लागावा. पडून पडायचं तर ठेच लागून पडू नये. चांगलं दोन हजार फुटांवरून पडावं. माणूस किती उंचावर पोचला होता, हे तरी जगाला समजेल.’
काही माणसांचं आयुष्यच चमत्कारिक. त्यांना सुखाचा आस्वाद जसा स्वस्थतेने घेता येत नाही, तशीच दुःखाची चवही. हादरण्यासारख्या घटना घडूनही त्यांना थांबता येत नाही.
कायम आजारी असलेल्या माणसाला जेव्हा इतर कंटाळतात तेव्हा त्याचा तो किती कंटाळलेला असतो हे इतरांच्या लक्षातही येत नाही. माणसाचं स्वतःच्याच कंटाळ्यावर प्रेम असतं.
स्वतःचे अनुभव उगीचच इतरांना सांगू नयेत. इतरांना एक तर ते अनुभव खोटे वाटतात किंवा आपण खोटे आहोत, असं वाटायला लागतं. ज्याने-त्याने स्वतःच्या मालकीचे अनुभव घ्यावेत.
नवीन वाहन घेतलं की, आठ-दहा दिवस आपण स्वतः धुतो. कालांतराने कपड्याचे चार-पाच फटके मारून भागवतो. हेच थोड्याफार फरकाने प्रत्येक बाबतीत. नावीन्याला सर्वांत मोठा शाप परिचितपणाचा. स्वतःच्या दोन-तीन वर्षांच्या अपत्याचे लडिवाळ चाळे किंवा हालचाली ह्यांतही माणूस किती काळ रमतो? आनंदाला फक्त एकच दिशा असते. ती दिशा ‘स्वतःची दिशा.’ म्हणूनच सगळ्या गोष्टींतला रस तत्काळ संपतो किंवा सुखवणाऱ्या एकूण एक गोष्टींच्या वर्तुळाने घेरूनही माणूस अस्वस्थ असतो.