पैसा, प्रतिष्ठा, ऐपत, मोठी जागा, नवनवीन वस्तू, प्रलोभनं ह्या सगळ्यामागे धावण्यात एक जीवघेणी शर्यत पाहतोय. एकही शांत मन, निवांत चेहरा आणि तृप्त वास्तू अनेक वर्षांत पाहिलेली नाही. आपल्याला काय हवंय हे अनेकांना समजलेलं नाही. ज्यांना समजलंय त्यांना ते मिळालेलं नाही. ज्यांना मिळालंय तेवढ्यावर ते राजी नाहीत. सतत हुरहुर, सतत काहूर.