अत्यंत महागडी, न परवडणारी, खऱ्या अर्थाने ज्याची हानी भरून येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे, ह्याचा हिशेब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती गोष्ट म्हणजे आयुष्य. ‘मन रमवणं’ ह्या नावाखाली गप्पागोष्टी, दिवसचे दिवस पत्ते खेळणं, पार्ट्या, सिनेमेच सिनेमे बघत सुटणं, निंदानालस्ती, गॉसिपिंग, शॉपिंग, बुद्धीला चालना न देणारी नटनट्यांच्या भानगडींची साप्ताहिकं वाचणं आणि ह्यांपैकी काहीही नसेल तर दिवसच्या दिवस लोळून काढणारे बहाद्दर मी पाह्यले आहेत.