बायको एक वेळ शरीराने दूर झाली तर चालेल, पण मनाने, विचारांनी दूर झाली तर फार वाईट. पहिल्या बाबतीतला दुरावा काही काळच अस्वस्थ करणारा असतो, पण दुसऱ्या बाबतीत निर्माण होणारी भिंत त्याच्यावर डोकं आपटलं तरी सहजी फुटत नाही. पुरुषांचं निम्मंअधिक बळ अशा भिंती पाडण्यात खर्च होतं आणि बायकांकडून कित्येकदा, शरीरासाठीच ही लाडीगोडी चाललेली आहे असा सरसकट अर्थ घेतला जातो. स्त्री शरीराने दूर झाली म्हणजेच फक्त पुरुष वैतागतो ही त्यांची अशीच गोड समजूत आहे. त्याला तसंच कारण आहे. शरीरसुखासाठी स्त्री राबवली जाते, पुरुष फायदा घेतात, ही किंवा अशा तऱ्हेची शिकवण स्त्रीवर्ग परंपरेने घोकत आला आहे.