ठिणगी ठिणगीच असते. ती कुठे पडते ह्यावर तिचं अस्तित्व टिकतं. पाण्याच्या पृष्ठभागावर पडते की ज्वालाग्राही साठवणीच्या गुदामात? माणसाचं मनही जलाशयाप्रमाणे शीतल आहे की स्फोटक वस्तूंचं गोडाऊन आहे ते ठिणगीशिवाय समजत नाही. संशय, स्पर्धा, द्वेष, मत्सर, क्रोध अशी नाना रूपं ठिणगीला धारण करता येतात. मन इंधनाने तुडुंब भरलेलं असेल तर ठिणगी उग्र रूपाने जगते.