“निवडणुका कॅन्सल करायच्या. कोणत्याही पक्षाचा उमेदवार उभा राहिला की तो निवडला गेल्याचं जाहीर करायचं. सगळे निवडून येतील. मग दिल्ली, महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा सगळीकडे स्टेट बँकेप्रमाणे विधानसभेच्या शाखा काढायच्या. सभा घ्या, ठराव पास करा, मायक्रोफोन तोडा, राजदंड पळवा, काहीही करा. सगळे निवडून आले तर हे प्रकार बंद होतील. विधानसभांना त्यांच्या त्यांच्या पक्षांची नावं द्या. जी विधानसभा जास्तीत जास्त लोकोपयोगी काम करील तिला राष्ट्रपती पुरस्कार द्या. मतदान, बोगस मतदान, मतमोजणी, फलक, बॅनर्स– किती खर्च वाचेल! प्रचार नको, लाऊडस्पीकर नको, सगळेच विजयी. मग खरं लोककल्याण कोण करतो ते आपोआप कळेल.”