More on this book
Community
Kindle Notes & Highlights
ज्येष्ठा नक्षत्राजवळ पोहचण्याआधी मागे वळलेला मंगळ,”
“सप्तर्षिंजवळ झालेले चंद्रग्रहण.”
शनीचीं रोहिणी नक्षत्राशी झालेली युती. ज्येष्ठा नक्षत्राजवळ पोहचण्याआधी मागे वळलेला मंगळ आणि सप्तर्षिंजवळ झालेले चंद्रग्रहण.
शनि आणि अल्डेबॅरन यांची युती इतिहासात कधी कधी झाली होती, यावर संशोधन केलं. इतिहासात आतापर्यंत सदतीस वेळा अशी युती झाल्याचं
अँटारेसजवळ पोहचण्याआधी मंगळ कधी मागे वळला, ती वर्षंही त्यांनी शोधून काढली आहेत. ते सतरा वेळा घडलं
सप्तर्षिंजवळ चंद्रग्रहण
महाभारताचं युद्ध ख्रि. पू. ३०६७ वर्षे म्हणजेच आजपासून पाच हजार वर्षांपूर्वी घडलं असलं पाहिजे,”
पांडव आणि कौरव यांचे पितामह असलेल्या भीष्म यांचा मृत्यू माघ महिन्यात झाला.
कालिबंगानमध्ये आम्हाला अग्निवेदी सापडल्या आहेत.
मोहेन जो दारोमध्ये धार्मिक स्नानासाठी वापरली जाणारी सार्वजनिक स्नानगृहं
भीम आणि दुर्योधन यांच्यातील अंतिम युद्ध हे सरस्वती नदीच्या काठावरच झालं होतं.
ओप्पनहेमरने गीता समजून घेण्यासाठीच संस्कृत भाषा शिकून घेतली होती.
“चांगले वकील कायदा जाणतात आणि महान वकील न्यायाधीशाला जाणतात,
अठरा जमातींचे ते संघराज्य होते आणि प्रत्येक जमातीला स्वतंत्र प्रमुख होता.
पहिला अवतार मत्स्याचा, दुसरा कुर्माचा, तिसरा वराहाचा, त्यानंतर चौथा नृसिंहाचा असे पहिले चार अवतार होत.
“सत्ययुगापाठोपाठ त्रेतायुग आले. त्यावेळी विष्णुने वामनावतार धारण केला आणि त्यापाठोपाठ परशुरामावतारही झाला.”
“आठवा अवतार तिसऱ्या टप्प्यावर म्हणजेच द्वापारयुगात झाला. तो होता कृष्णावतार.
विष्णुचा नववा अवतार म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून भगवान गौतम बुद्ध होय.”
“कल्की पुराणानुसार, कल्की हा संभाला नावाच्या गावात जन्म घेईल….”
“कल्की हा निष्णात घोडेस्वार असेल. आपल्या पांढऱ्याशुभ्र देवदत्त नावाच्या घोड्यावर बसलेला कल्कीच नेहमी दाखवला जातो…”
“कल्की पुराणात असं सांगितलं गेलं आहे, की या अवताराला प्रभू शिवाचे आशीर्वाद लाभलेले असतील आणि ते त्याला शुक नावाचा एक पोपट भेट देतील….”
“त्याच्याजवळ एक तळपती, तेजस्वी तलवार असेल - तिचे नाव रत्न मारु….”
“कल्की सोनेरी रंगाचे चिलखत घालत असेल आणि त्या चिलखतावर छातीच्या मध्यभागी येणाऱ्या भागावर मोठ्या आकारात सूर्याचे चित्र असेल…”
गांधारी आपल्या पुत्रांच्या मृत्यूचा शोक करत होती. त्या दु:खावेगात कौरव वंशाच्या सर्वनाशाबद्दल तिने कृष्णाला शाप दिला, की त्याचा स्वत:चा वंशही येत्या ३६ वर्षांनंतर नष्ट झालेला असेल. दंतकथेनुसार, छत्तीस वर्षांनंतर महापूर आला आणि द्वारका नगरीत घराघरांत पाणी शिरलं. कृष्णाने आपल्या यादववंशीयांना जहाजात बसवून उंचावर नेलं.
जारा नावाच्या एका शिकाऱ्याने कृष्णाचा डावा पाय हलत असल्याचं पाहिलं. त्याला तो हरणाच्या कानासारखा वाटला. त्या दिशेनं त्यानं बाण सोडला.
एक योजन अंतर म्हणजे नऊ अमेरिकन मैल आणि निमिष म्हणजे सेकंदाच्या ७५ भागांपैकी १६ भाग.
सतधन्वा नावाच्या यादवाने सत्राजिताचा वध केला. त्याने तिथून स्यमंतक मणी चोरला आणि तो अक्रूराकडे ठेवला.
कुंती ही वसुदेवाची भगिनी होती.
“बौद्धायन सुलभसूत्र या प्राचीन वैदिक भूमितीशास्त्रात मस्ताबा ऑफ जोझरची रचना अगदी परिपूर्णतेने वर्णिली गेली आहे, असं मी तुम्हाला सांगितलं तर?”
‘इजिप्शियन बुक ऑफ डेड’ या पुस्तकातील प्रार्थना ही तैत्तिरिया संहितेतील वर्णनाशी मिळतीजुळती आहे.
फ्रेंच तत्त्वज्ञ वॉल्टेअरने असं निसंदिग्धपणे म्हटलं आहे, की भूमिती शिकण्यासाठी पायथागोरस गंगेच्या किनारी गेला होता. ‘हिस्ट्री ऑफ मॅथेमॅटिक्स’चा लेखक अब्राहम सिडेनबर्ग यानेही बॅबिलोनिया, इजिप्त किंवा ग्रीस येथील सर्वच प्राचीन गणितज्ज्ञांच्या गणिताचा स्त्रोत सुलभसूत्र असल्याचं म्हटलं आहे. फक्त पायथागोरसचा सिद्धांतच नव्हे; तर दशांश पद्धती, शून्याची आणि अपरिमित किंवा अनंत (इन्फिनिटी) ही संकल्पना या साऱ्या गोष्टी वैदिक विद्वानांनी निर्माण केल्या होत्या. आता आधुनिक संगणकांमध्ये सर्वसामान्यपणे सातत्यानं वापरली जाणारी बायनरी पद्धतीही वैदिक श्लोकांच्या आधारेच विकसित केली गेली होती!”
संस्कृत भाषेत त्या शब्दामागे ‘सु’ हा शब्द जोडला जातो. म्हणूनच मेरूच्या मागे सु हा शब्द जोडला की सुमेरू हा शब्द बनतो. सुमेरूच्या संस्कृतीसाठी सुमेरू हा संस्कृत शब्द वापरला जातो.”
“टायग्रिस - युफ्रेटस खोऱ्यात गेलेले लोक चंद्रपूजकच राहिले. ज्यू धर्मसंस्थापक अब्राहम हासुद्धा याच भागातून आला होता आणि तो आणि त्याचे कुटुंबीयही चंद्रपूजक होते.
अब्राहमच्या पत्नीचं नाव सारा आणि ब्रह्माच्या पत्नीचं नाव सरस्वती आहे.
झौराष्ट्रीयनांनी लिहिलेल्या ‘गाथाज’ या धार्मिक ग्रंथांमधील काही उतारेच्या उतारे ऋग्वेदातील ऋचांशी साधर्म्य दर्शवणारं आहेत.”
“ज्यू लोकांनी आपल्या देवाला दिलेलं याहवाह हे नाव अग्नी या ऋग्वेदातील देवतेशी साधर्म्य दर्शवतं. ऋग्वेदात अग्नीसाठी एकवीस वेळा याहवा, याहवाह, याहवम आणि याहवस्य अशी नावं वापरल्याचं आढळतं.”
“ही जपमाळा ग्रहमालेच्या मार्गाचे प्रतिनिधीत्व करते. सूर्य आणि चंद्र यांच्या आकाशातील मार्गांचे प्रतिनिधीत्व करते. या मार्गाचे योग्यांनी २७ समान भागांत विभाजन केले. त्यालाच नक्षत्रं असं म्हणतात. या प्रत्येक नक्षत्राच्या समान चार भागांना पद असं म्हणतात. याचा अर्थ सूर्य आणि चंद्र यांची अवकाशातील १०८ स्थानं यामुळे निश्चित करण्यात आली आहेत,” माताजींनी स्पष्ट केले. “परंतु याहूनही १०८ या आकड्याचं आणखी वैशिष्ट्य काय आहे, हे तुला माहिती आहे का?” तारक त्यांच्याकडे अपेक्षेने पहात राहिला. त्याला त्याचे उत्तर मिळाले. “सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील अंतर सूर्याच्या व्यासाच्या बरोबर १०८ पट आहे, ही खरी
...more
तिला हाथर देवता मानलं जात असे. हेसट या दैवी गाईचा पृथ्वीवरील अवतार म्हणजे हाथर!”
प्राक्कालापासून अस्तित्त्वात असलेली पृथ्वीवरील देवता म्हणून ग्रीक लोक एका देवतेचं पूजन करत असत. ती देवता कोण होती, हे तुला माहिती आहे का? गैआ. की तिला गया म्हणायचं?
बायबलमध्ये वर्णन केलेला प्रलय हा ख्रि. पू. २४४८ मध्ये आला असला पाहिजे, असे ते मानतात. नोहाने आपली भली मोठी नौका त्या प्रलयातून विविध प्रकारच्या जिवांना वाचवण्यासाठी बनवली होती, असं ते समजतात.
मथुरा हे कृष्णपूजेचं स्थळ असल्याचा उल्लेख त्याने त्यात केला आहे.
ख्रि. पू. दुसऱ्या शतकात संस्कृत व्याकरणकार पाणिनीने कृष्णाने कंसाचा वध केला, असं लिहिल्याचा उल्लेख आढळला. ख्रि. पू. चौथ्या शतकात लिहिल्या गेलेल्या कौटिल्याच्या अर्थशास्त्रात कृष्णाचा कित्येक वेळा उल्लेख आला आहे.
इस्लामचा प्रसार होण्यापूर्वी काबा हे ख्रिस्ती नसलेल्या लोकांचं मंदिर होते, ही वस्तुस्थिती जग विसरून गेलं आहे. काबा येथे ३६० मूर्ती होत्या. वर्षातील प्रत्येक दिवशी त्यांच्यापैकी एकेका देवाची पूजा केली जात असे. चंद्रदेव हुबळ हा त्यांच्यापैकी प्रमुख देव होता. शिवाशी त्याचं साधर्म्य आहे. शिवाप्रमाणेच हुबळनेही मस्तकावर चंद्र धारण केला आहे. शिवाच्या पवित्र जटेतून गंगा वाहते, त्याप्रमाणेच हुबळच्या जटेतूनही झमझमचा प्रवाह बाहेर पडतो,” माताजी म्हणाल्या. “काबा येथील कित्येक विधी मुस्लिमांनी तसेच सुरू ठेवले होते. हिंदु लोक अग्नीभोवती सात प्रदक्षिणा घालतात, त्याप्रमाणे मुस्लीमही काबाभोवती सात प्रदक्षिणा
...more
हुबळच्या अल् लत, उझ्झा आणि मनत या तीन देवतांनी गुजरातच्या सोमनाथ मंदिरात आश्रय घेतला आहे, असा विचार त्यानंतर बऱ्याच काळानंतर मुस्लिमांमध्ये पसरला.
युआन मॅकी या इंग्लीश पुरातत्त्ववेत्त्याला अक्षरं कोरलेली मातीची एक पट्टी सापडली होती. त्यावर कृष्णाने अर्जुन वृक्ष उखडल्याच्या कथेचा संदर्भ कोरण्यात आला होता. आता मातीची ही पट्टी कुठे सापडली होती, याचा काही अंदाज बांधता येतो का? मोहेन जो दारोला ती सापडली होती.
द्वारका या कृष्णाच्या वैभवशाली नगरीच्या उभारणीसाठी वृष्णी, भोज, कुकुर, शैन्य आणि चेदी यांनी साहाय्य केले होते.
यादवांचे अठरा वंश होते. प्राचीन भारतीय ग्रंथात त्यांच्या नावांचे आलेले उल्लेख असे आहेत: हैहयास, छेदी, विदर्भ, सातवत, अंधक, कुकुर, भोज, वृष्णी, शैन्य, दासर, मधु आणि अर्बुद.
“कृष्णाच्या आजोबांचं नाव शूरसेन होतं आणि त्यांच्या वंशापैकी काही जणांना शैन्य म्हटलं जाऊ लागलं. कित्येक पिढ्यांनंतर शैन्य लोक पंजाबमध्ये स्थायिक झाले आणि त्यांना सैनी या नावानं ओळखलं जाऊ लागलं.
“सतवताच्या मुलाने स्थापन केलेला दुसरा वंश म्हणजे वृष्णी. सतवत हासुद्धा यदु वंशाचाच होता. प्रथम ते उत्तर भारतातील बरसना या भागात स्थायिक झाले आणि नंतर तिथून ठिकठिकाणी स्थलांतरित झाले. तिथे त्यांच्या कुटुंबीयांना विविध आडनावांनी ओळखलं जाऊ लागलं. वर्षने, वर्षनी, वर्षनया, वॉर्ष्ने, वर्ष्नी, वृष्णी, व्रिष्णी अशी विविध नावं मिळाली.