महागासुर

महागाईच्या केळीच्या सालीवर घसरून धाडकन पडलो
अर्ली रिटायरमेंट चे स्वप्न बघत नोकरीतच रखडलो दहा रुपयाची राइस प्लेट कधीच भूतकाळात गेलीआता तेवढ्या पैशात पाव किलो भाजी ही मिळेनाशी झाली
चांगल्या चाकरीचा चुकून बोनस मिळाला यंदाआनंदात घरी नेला चक्क एक किलो कांदा
मित्रांनी पण जरा घाबरतच पार्टी मागितलीमग बायकोने अनेक महिन्याने तुरीची आमटी केली
आमचा संपूर्ण शिक्षणाचा खर्च जेवढ्यात झालातेवढी रक्कम तर पर्वा शाळेचा रिक्षावाला घेऊन गेला
न पिणाऱ्या मित्राने देखील काल दारू विकत घेतलीपेट्रोल पेक्षा स्वस्त म्हणून स्कूटर च्या टाकीत ओतली
हल्ली तर आजारी पडायची सुद्धा भितीच वाटतेकारण पगारापेक्षा हॉस्पिटल चे बिल जास्त  साठते
गरीबीच्या गुढग्यांना मिळाली पेन्शन ची काठीनिवृत्तीच्या दारात पोचलो अचानक उगवली साठी
आता महागाईच्या समुद्रात झकत तरावं लागेलनाहीतर परवडत नाही म्हणून लवकर मरावं लागेल
 •  0 comments  •  flag
Share on Twitter
Published on August 18, 2013 12:44
No comments have been added yet.