A two part interview in the Marathi environment magazine - Aaple Paryavaran (Our environment)

पंकज सेक्सारिया : एक संवेदनशील संशोधक पंकज सेक्सारिया हे एक संशोधक, लेखक, फोटोग्राफर, अभ्यासक आणि पर्यावरणीय क्षेत्रातील सक्रीय कार्यकर्ते आहेत. पर्यावरण आणि वन्यजीव संवर्धनाच्या क्षेत्रात त्यांनी व्यापक स्वरूपाचे काम केले आहे, विशेष करून अंदमान आणि निकोबार बेटांच्या संबंधात. या बेटांसंबंधित विषयांवर ते १९९८ पासून इंग्रजी प्रसारमाध्यमांमध्ये नियमितपणे लिहित आहेत. त्यांनी या बेटांवर आधारित दोन ललितेतर पुस्तके Troubled Islands (2003; पत्रकार म्हणून त्यांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह) आणि The Jarawa Tribal Reserve Dossier: Cultural And Biological Diversity in the Andaman Islands (Jt.Editor 2010) ही लिहिली आहेत. गेल्या १२ वर्षांपासून ते कल्पवृक्ष या पर्यावरण अॅक्शन ग्रुपशी जोडलेले आहेत. अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये अजूनही असलेल्या समस्यांबद्दल त्यांना काळजी आहे आणि त्या सोडविण्यासाठी ते आपले व्यापक संशोधन, कायदेशीर हस्तक्षेप, प्रचार पत्रकारिता आणि आपल्या नेटवर्किंगद्वारे सतत प्रयत्न करत आहेत. त्यांनी आपली मास्टर्स डिग्री जामिया मिलीया इस्लामिया विद्यापीठ, नवी दिल्ली येथून पूर्ण केली आहे आणि सध्या ते मास्ट्रीच युनिव्हर्सिटी (Maastricht University, Netherlands), नेदरलँड्स येथून सायन्स, टेक्नोलॉजी अॅन्ड सोसल स्टडीज मध्ये पीएचडी करत आहेत. नुकतीच अंदमान आणि निकोबार बेटांवर आधारित त्यांची एक कादंबरी “द लास्ट वेव्ह” हार्पर कॉलिन्स पब्लिशर्स, इंडिया कडून प्रकाशित करण्यात आली आहे. वास्तविकतेचा भक्कम पाया असलेल्या या कादंबरीला टीकाकारांकडून भरपूर प्रशंसा प्राप्त होत आहे आणि देशभरातील वाचकही तिच्या प्रेमात पडले आहेत. तर जाणून घेऊयात पंकज यांच्या प्रवासाविषयी आणि त्यांच्या कादंबरी विषयीही. 
१. मॅकेनिकल इंजिनिअरींगमध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर पारंपारिक मार्गाने न जाता पदव्युत्तर शिक्षणासाठी तुम्ही मास कम्युनिकेशन या विषयाची निवड केली आणि नंतर तुम्ही पर्यावरण आणि वन्यजीवांसंबंधित विषयांकडे आकर्षित झालात, हे कसे?  ....
To read the full interview visit : http://parikshitsuryavanshi.blogspot.in/2015/01/blog-post_21.html
 •  0 comments  •  flag
Share on Twitter
Published on January 22, 2015 08:18
No comments have been added yet.