डी डी एल जे - टू

(पडदा उघडतो.)

(प्रवेश पहिला)

निवेदिका स्टेजच्या मध्यावर उभी आहे.

निवेदिका: नमस्कार मंडळी. 'दिलवालेदुल्हनिया ले जायेंगे' अर्थात आपल्या आवडत्या डी. डी. एल.जे. ला आज तीस वर्षं पूर्ण होतायत. त्यानिमित्त आपल्यासमोर येतायत, खरे-खुरे - ज्यांच्या जीवन-कहाणीवर हा चित्रपट निर्माण झाला, ते राज आणि सिमरन!

टाळ्यांच्या गजरात राज आणि सिमरन स्टेजवर येतात. 

निवेदिका: राज आणि सिमरन, thirtieth anniversary च्या शुभेच्छा!

सिमरन: धन्यवाद!

राज: धन्यवाद निवेदिकाबाई.

निवेदिका: अहो, माझं नाव निवेदिकानाही काही, निवेदिता आहे.

राज: ता? का?

निवेदिता: कारण, बडे बडे देशों में ऐसी छोटी छोटी बातें...

सिमरन टाळी देते. 

राज: (चूप होण्याची कृती -तोंडावर बोट). 

निवेदिता: राज, सिमरन - पुन: एकदा स्वागत! तुमच्या युनिक, जगावेगळ्याकहाणीनं आम्हां सर्वांनाच अजूनही भूल घातली आहे. तुम्ही पुढच्या पिढीवर संस्कारकेलेत, नव्हे आपल्या संस्कृतीची,कुटुंबव्यवस्थेतल्या मूल्यांचीजाणीव करून दिलीत!

राज: थांबा, थांबा.आम्हांला इथे बोलावल्याबद्दल धन्यवाद. पण आत्ता जे तुम्ही म्हणालात, त्यातलं ‘आम्ही भूल घातली’ आहेहे एक वाक्य सोडलं तर खरं नाहीये हं बाकीकाही.

निवेदिका: असं का म्हणता?

सिमरन: अगदी कालपर्यंत आम्ही असं बोललो नसतो. पण, आज आम्हांला हा नवाधडा मिळाला आहे.... आमची गोष्ट जगावेगळी नव्हती आणि यात कुठल्याही संस्कृती किंवासंस्कारांचं पालन केलेलं नव्हतं.

निवेदिका: काय म्हणता?

राज: सांगतो, सांगतोकाय घडलं ते.... तुम्ही बसा जरा प्रेक्षकांत.

(प्रवेश दुसरा)

राज दार उघडून घरात शिरतो.

राज: सिमरन, सिमरन, लवकर बाहेर ये.

सिमरन: (आतून धावत बाहेर येते) राज? आलास का? लागला कारिझल्ट?

राज: ते मला काय माहिती?

सिमरन: छान! मग कशाला एवढं घाई-घाईनं बोलावलंस मला?

राज: अगं, गंमत तर ऐक!

सिमरन: काय झालं?

राज: मी दुकान बंद करत होतो. तेवढ्यात एक गाडी आली समोर.चार-पाच मुली होत्या तिच्यात. मी शटर खाली करतच होतो तोच एक मुलगी धावत आली आणिम्हणाली, ‘अहो काका..’

सिमरन: (नाटकी आवाजात) ‘डोकं दुखतंय.. जरा औषधांच्या गोळ्याविकत देऊ शकाल का? शेवटी ना, एक भारतीय माणूसच आपली मदत करू शकतो..’ असं म्हणालीना ती?

राज: अजिबात नाही!

सिमरन: (वेगळ्या नाटकी आवाजात) ‘काका, तुम्ही अगदी शाहरूखखान सारखे दिसता.’ असं म्हणाली का मग?

राज: अजिबात नाही!

सिमरन: (अजून मिश्किल आवाज) मग काय? सरळ ‘तुझे देखा तो येजाना सनम?’ म्हणायला लागली?

राज: अजिबात नाही!

सिमरन: (आता जरा रागावून) ठीक आहे. तुझी बात सांग.

राज: अगं ती मुलगी मला म्हणाली, ‘काका-’

सिमरन: ‘मला वाचवा’?

राज: अगदी बरोब्बर! मला म्हणाली, ‘आमची पार्टी आहे.आम्हांला जरा ड्रिंक्स घेऊ द्या ना. मी मैत्रिणींशी पैज लावलीये की तुम्हांलापटवेन’.

सिमरन: जास्त हुरळून जाऊ नकोस. तिला फक्त (‘बाटली’चीaction) घ्यायची होती.

राज: अगं, आपल्या राहुलच्या वयाची आहे ती.

सिमरन: म्हणूनच म्हणतेय मी.

राज: तू काय झालं ते ऐक ना!

सिमरन: तू दुकान उघडून तिला तिचं घेऊ दिलंस सामान. दुसरंकाय?

राज: अजिबात-

सिमरन: तुझी बात!

राज: मी तिला म्हटलं, ‘DDLJ बघितलाआहेस का?’

सिमरन: आणि ती म्हणाली... (थांबून) तूच सांग.

राज: ती म्हणाली, ‘हो ना! म्हणूनच ठरवलं. तुम्हांला सरळसांगायचं. पार्टी आहे, ड्रिंक्स द्या’. मी म्हटलं, ‘देईन पण एका अटीवर...’

दाराची बेल वाजते. राज दार उघडतो. राहुल (त्यांचा मुलगा) आतयेतो.

सिमरन: राहुल, आलास?किती उशीर?

राज: ये! लागला का रिझल्ट?

राहुलच्या चेहऱ्यावरून तो पास झालाय की नापास हे कळणं अवघडआहे.

सिमरन: काय रे? काय झालं?

राज: अरे घाबरू नकोस. तुला माहिती नाही का? नापास होण्याचीआपली मोठी परंपरा आहे... मी, माझे वडील, माझे आजोबा..,

राहुल: (दु:खानं, खाली मान घालून) हो, आणि मी ती मोडली आहे!

राज / सिमरन: (एका सुरात) म्हणजे? तू पास झालास? तू मास्टर्सझालास?

राहुल: हो.

राज / सिमरन: (थोड्या खालच्या आवाजात, जणू वाईटच वाटलंय)अभिनंदन!

सिमरन: (राजकडे वळून) राज, आता हा पास झाला असला तरी मीह्याला युरोप ट्रिपला पाठवणार आहे. ह्यानं तुझ्या कुलाची परंपरा मोडली असली तरी मीतुझं बिलकुल ऐकणार नाही.

राहुल: आई, मला नाही जायचं युरोपात.

सिमरन: का रे?

राज: तुला युरोपात पाठवण्याबद्दल आपण नंतर बोलू. (सिमरनकडेबघून) तुला आठवतं का हा येण्याआधी मी काय बोलत होतो ते.

सिमरन: हो! तू मुलींबद्दल बोलत होतास.

राज: त्यांना मी एक अट घातली होती.

सिमरन: काय?

राज: पार्टी आमच्या घरी करायची आणि तिच्यात राहुलला सामीलकरून घ्यायचं.

सिमरन: धन्य! आणि त्या तयार झाल्या?

राज: मग काय?

राहुल: त्या तयार असल्या तरी मी तयार नाहीये.

दाराबाहेरून मुलींचा कोलाहल ऐकू येतो.

राज: आल्याच बघ त्या. सिमरन, चल आपण ‘जरासा घूम लूं मैं’करून येऊया. यांना करू देत पार्टी. तुला मस्त जेवायला नेतो बाहेर.

बेल वाजते. राज दार उघडतो. (एक मुलगी येते.)

राज: ये. मी ओळख करून देतो हं. हा आमचा राहुल... नाम तो सुना होगा? आणि ही माझी सिमरन - सिम्मी. (Background music – Tujhe Dekha to Ye Jana Sanam onSantoor) आणि... (मुलीकडे बोट दाखवून-) ही अजून एक सिम्मी. (Background music – Tujhe Dekha to Ye Jana Sanam – doublespeed)

सिमरन: तुझं नाव सिम्मी – म्हणजे सिमरन - कुणी ठेवलं?

सिम्मी: छे. छे. माझं नावसिमरन नाहीये. सीमा आहे. मीच त्याचं सिम्मी केलं.  पण माझ्या बाबांचं नाव राज आहेहं...

सिमरन: आणि आईचं?

सिम्मी: माझ्या आईचं नाव अलका.दोघे टेनिस खेळतात. अलकाराज – नाम तो सुना होगा?

राज: बरं बरं सिम्मी. पण तुझ्या मैत्रिणी कुठे गेल्या?

सिम्मी: आहेत की बाहेरच. मगाशी जसं दुकानात पाठवलं मला एकटीलाच, तसंच इथेही मलाच एकटीला धाडलं.

राहुल: धाडलं? वा! एकदमधाडसी आहेस!

सिमरन: (दाराकडे जात) अग त्यांना आत बोलाव. (दार उघडते,तीन मुली आत येतात.) या. या. Welcome!

सिम्मी: मी ओळख करून देते हं.  ही अंजली (Background music – Kuchh Kuchh Hota Hai) , ही पूजा (Background music – Dil To Pagal Hai)आणि ही तानी (Background music – Rab Ne Bana Di Jodi).

राहुल: (छद्मीपणे) अरे वा! सगळ्या शाहरुख खानच्या picturesमधून directly import केल्या आहेत असं वाटतं.

सिम्मी: अंकल, हा काय मस्त बोलतो!

राज: तो बोलतो, गातो, गिटार वाजवतो; पण नाच करत नाही...

चौघी: राहुल डान्स करत नाही? राहुल डान्स नही करता?

राज/सिमरन/राहुल: (नकारार्थी माना हलवतात.) 

चौघी: आम्ही शिकवू. 

राज / सिमरन: येस प्लीज!

राहुल: नो, नो, नो!

सिमरन: मुलींनो, तुम्हीयेणार हे मला माहिती नव्हतं. मी फक्त या राहुलला आवडतो म्हणून दाल-चावल केला आहे. 

राज: काही काळजी करू नका. आज राहुलचा रिझल्ट लागला आहे आणितो पास झाला आहे! चांगलं कापा त्याला... खा पिझ्झा -

सिम्मी: आणि पीत जा?

राहुल: आई, मी येतो ना तुमच्याबरोबर.

सिमरन: मुकाट्यानं घरी थांब. चल रे राज.

(राज-सिमरन जातात.)

राहुल: (आतजायला निघतो.) मी दाल-चावल आणतोआपल्यासाठी. 

सिम्मी: (त्यालाथांबवून, त्याचा हात धरून -)दाल-चावल? चला ग म्युझिक सुरू करा. आधीच पार्टीलाउशीर झालाय. माझ्याकडे एक नवीन धमाल गाणं आहे, या राहुलसाठी. इसको लगा डाला तो -

चौघी: लाइफ झिंगालाला!

(प्रकाश मंदावतो. म्युझिक सुरू.)

(एक मुलगी:)

डाल है ये सिम्पल

इस में ना मसाला

डाला ना किसीने

कुछ भी इस में काला

(दुसरी मुलगी:) अरे थोडा तडका लगा डाल ना!क्यूं की – 

तडका लगा डाला तो लाइफ झिंगालाला, झिंगालाला

इसको लगा डाला तो लाइफ झिंगालाला,झिंगालाला

(मुलगा:)

डाल गल के पूरी

बन चुकीघोटाला

तीखी पर बहोत है

केहे दे खानेवाला

(एक मुलगी:) अरे उसको मसका लगा डाल ना! क्यूंकी –

मसका लगा डाला तो लाइफ झिंगालाला, झिंगालाला

इसको लगा डाला तो लाइफ झिंगालाला,झिंगालाला

(अंधार होतो. हळू हळू जेव्हा पुन: प्रकाशहोतो तेव्हा राहुल खाली पडलेला आहे. सिम्मी बाजूला बसून त्याला उठवण्यासाठी घंटावाजवते आहे. हळू हळू राहुल उठून बसतो. डोकं धरून.)

राहुल: मी कुठे आहे? 

सिम्मी: काय प्रश्न विचारतोस रे? स्वत:च्या घरी आहेस. 

राहुल: आणि तू अजून इथे काय करते आहेस?

सिम्मी: छान! तू हा प्रश्न मला विचारतोयस. मेल्या - म्हणजेमेल्यासारखा - पडला होतास. मला काळजी वाटायला लागली तुझी आणि म्हणून थांबलेतुझ्यासाठी . 

राहुल: (भानावर येत) माझे आई-बाबा कुठे आहेत?

सिम्मी: ते आहेत आत. झोपलेत. ते आले तेव्हा तू शुद्धीवरनव्हतास. मग मीच म्हटलं, तुम्ही झोपा, मी बसतेइथे. 

राहुल: आणि तुझ्या मैत्रिणी?

सिम्मी: (उठून) त्या गेल्या युरोपला. त्यांची सकाळी लवकरट्रेन होती लंडनहून. 

राहुल: म्हणजे तू माझ्यासाठी युरोप ट्रिप सोडून दिलीस आणिइथे थांबलीस?

सिम्मी: (सहज) हो!  (Backgroundmusic – Na Jane Mere Dil Ko Kya on Santoor)

राहुल: (उठून उभा राहतो आणि तिच्याकडे जातो) तू खरंचमाझ्यासाठी थांबलीस?

सिम्मी: (वळून,त्याच्या समोर) हो! (Backgroundmusic – Na Jane Mere Dil Ko Kya to Ye Jana Sanam on Santoor)

राहुल आणि सिम्मी दोघे हातात हात घेतात. (Background music – Ho gaya haitujhko to pyar sajana, in fast rhythm)

तेवढ्यात राज आणि सिमरन प्रवेश करतात आणि टाळ्या वाजवतात. राहुल आणि सिम्मी चपापतात. 

राज: चला राहुल, कबुतरांना दाणेघालायची तयारी करायला लागा.

सिम्मी: अंकल,प्रॉब्लेम आहे. मलायाच्याशी पळून जाऊन लग्न करायचं आहे.

राज: शक्य नाही. राज आणि सिमरनच्या घरात प्रेम हे 'राज' राहत नाही आणि लग्न हे 'रन'करून केलं जात नाही.

सिम्मी: अंकल,तुम्ही माझ्या बाबांना ओळखत नाही. DDLJ चूक आहे असं त्यांचं मत आहे.

राज / सिमरन: म्हणजे? आम्ही चूक? ही आमची खरी गोष्ट नाही?

सिम्मी: तुम्ही त्यांच्याशी बोला ना. मग लक्षात येईलतुमच्या!

राहुल: सिम्मी, मी पळून जाऊन लग्न करायला तयार आहे!

राज: आणि मी तुझ्या बाबाला भेटायला तयार आहे. राहुल, पळू नकोस! सिम्मी,तुझ्या बाबांना फोन लाव. सांगआम्हांला भेटायचंय त्यांना. 

सिम्मी: ते अमेरिकेत गेलेत, बिझिनेससाठी.

सिमरन: खरं की काय? राज,ही सिम्मी तिला हवं तेव्हा डी.डी.एल.जे.च्या गोष्टीप्रमाणे वागतअसते हं. 

तेवढ्यात बेल वाजते. राहुल दार उघडतो. सिम्मीचे वडील. 

सिम्मी: पॉप्स! तुम्ही आलात?

सिमरन: तुम्ही अमेरिकेतून आलात?

राज: तुम्ही इथे कसे आलात?

पॉप्स: माका सिम्मीच्ये मैत्रिणी बोलल्ये. ता हयच ऱ्हवला. 

राज: ऱ्हवला? हां,हां, हरवला. छे. छे. तुमची मुलगी हरवलीनाहीये. आहे की समोर - ही बघा.

पॉप्स: ओ, ऱ्हवला वेगळा, हरवला वेगळा. समाजला?

राज / सिमरन मानेनेच नाही म्हणतात.  

राहुल: ही कुठली भाषा आहे?

सिम्मी: मालवणी. बाबा रागावले की मालवणी बोलतात.

राहुल: पण ते का रागावले आहेत?

सिम्मी: बाबा, तुम्ही कारागावला आहात?

पॉप्स: तुझ्ये मैत्रिणी सांगूक लागले की तुका 'डी.डी.एल.जे.'च्ये राज आणि सिमरन गावले.

सिम्मी: (राहुलला भाषांतर करून सांगते) - ते म्हणतायत,माझ्या मैत्रिणींनी त्यांना सांगितलं की मला डी. डी. एल. जे. चे राज आणि सिमरन भेटले. (पॉप्सना -) हो! हेच ते. (राजआणि सिमरन कडे बोट दाखवते.)

राज आणि सिमरन नमस्कार करतात. 

पॉप्स: (कोपरापासून नमस्कार करतात) माका तुमची स्टोरीच पटनानाय.

राज / सिमरन: का हो? 

पॉप्स: पहिला माका सांगा.

राज: सांगतो, पण तुम्हीकृपया मराठीतून सांगा.

सिम्मी: पॉप्स, प्लीजमराठीतून सांगा ना.

पॉप्स: सांगतंय. सांगतंय. 

राहुल: कोण सांगतंय?

सिम्मी: (हळूच राहुलला) अरे, म्हणजेतेच सांगतायत!

सिम्मी: पॉप्स, प्लीजप्लीज मराठीतून सांगा ना.

पॉप्स: बरा.... (थोडा वेळ थांबतात. वर-खाली,आजू-बाजूला बघून एकदम शुद्ध मराठीत प्रेक्षकांना) मला सांगा, कुलजीत जर चांगला मुलगा निघाला असता तरसिमरननं लग्न केलं असतं ना त्याच्याशी? राज काही तरी करूशकला असता का? मग 'डी. डी. एल. जे.' चा झाला असता 'हम दिल दे चुके सनम'! आणि हा करत राहिलाअसता 'मान ना मान, मै तेरासलमान!'

राज: पण आपली संस्कृती नाही का आई-वडिलांचे आशीर्वाद घेऊनचलग्न करायची?

पॉप्स: पुन्हा ताच. कुलजीत पडलोअसतो पाया हेका घेउन तर तू कूल ऱ्हवलं असतंस काय?

राज: कुल हरवणार? तेकसं?

सिम्मी: अहो अंकल, कूलऱ्हवणार म्हणतायत ते. ऱ्हवणार म्हणजे राहणार. त्यांनाअसं म्हणायचंय की कुलजीत पाया पडला असता आंटीला घेऊन, तर तुम्ही कूल राहिला असतात का?

सिमरन: पण राहुल तर चांगला मुलगा आहे ना. मग कशाला ह्यांनीदोघांनी पळून जायचं?

पॉप्स: माका चुकीचो संदेश देवचो नाय आसा म्हनान! चल गो सीमा,घराक जावया.... 

सिम्मीचा हात धरून दाराकडे जायला लागतो. राज / सिमरन 'अहो थांबा' असं ओरडतात. राहुल 'सिम्मी, सिम्मी' असं....तेवढ्यात बेल वाजते. सिम्मी दार उघडते. दारात तिची आई.

सिम्मी: आई, तूकशाला आलीस इथे?

सिमरन: तू? (आश्चर्यानंबघते)

राज: (निरखून बघत) आपण भेटलोत का पूर्वी?

प्रीती: हो. मी अलका. (पॉप्सच्या खांद्याला हात लावून)ह्यांची बायको. पण लग्नाआधी माझं नाव प्रीती होतं. 

राजच्या डोक्यात प्रकाश पडतो.

पॉप्स: तुम्ही लग्न करणार म्हणून सांगून फसवलास ना,ता.

राज: पण तो गोंधळ माझ्या वडिलांनी घातला होता.... आणि मीमाफी मागितली होती हिची.

पॉप्स: आणि आपली स्टोरी जगाक सांगूक गेलास...."दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे" म्हणान....

सिम्मी: बाबा, मराठी,प्लीज.

पॉप्स: (प्रेक्षकांना -) एक तर पिक्चरमध्ये होता एकच हीरो.मग दिलवाले झाले कशे? दिलवाला म्हणायला हवं ना? 

सिम्मी: आई, तूचकाही तरी कर ना. बाबा म्हणतायत आम्ही पळून जाऊनच लग्न करायला हवं म्हणून.

राहुल: मी पळून जायला तयार आहे.

प्रीती: शाब्बास. ह्याचं नाव काय गं?

सिम्मी: राहुल.

राज: राहुल पळून जाणार नाही. राहुलभाग नही सकता. (त्याचा हात धरून ठेवतो.)

सिमरन: प्रीती, तुलामी कोणत्या तोंडानं बोलावं हे कळत नाही. पण तूच सांग ना काही तरी ह्यांना. 

प्रीती: 'दिलवालेदुल्हनिया ले जायेंगे' मध्ये माझं हसणं किंवारडणं सोडून काहीच काम नाहीये. आणि आत्ता मला हसावं की रडावं ते कळत नाहीये. 

राज: थांबा. मी तेव्हाही म्हटलं होतं की घरच्यांची संमतीअसल्याशिवाय मी लग्न करणार नाही. आत्ताही पॉप्स आणि प्रीतीची मान्यता नसेल,तर -

पॉप्स: (प्रीतीला) तूच सांग आता. 

प्रीती: ऐका तर मग. तुम्हांला माझं हृदय दुखावण्यापेक्षाहीजास्त काळजी होती ती आपली गोष्ट कशी जगावेगळी असेल ही. आज तीस वर्षांनीही लोकम्हणतील, 'डी. डी. एल. जे. मध्येराजनं पळून जाऊन लग्न केलं नाही.' होना?

राज / सिमरन: हो!

प्रीती: आणि कुठल्या गाण्यावर नाचलो आपण?'मेहंदी लगा के रखना, डोलीसजा के रखना'. बरोबर?

राज / सिमरन: बरोब्बर. पण त्याचा इथे काय संबंध?

प्रीती: मी सांगते हे सगळं कसं खोटं होतं ते. शेवटी सिमरनचेवडील तिचा हात सोडतात आणि ती ट्रेन पकडायला धावत जाते. राज तिचा हात धरतो आणि तिलाट्रेनमध्ये खेचतो. राज-सिमरन आणि राजचे वडील पळून जातात. बरोबर?

राज: बरोबर. पण सिमरनच्या वडिलांची मान्यता मिळाल्यामुळे. 

प्रीती: त्यांनी 'जासिमरन' म्हणून पळून जायला मान्यतादिली. 'ये राज, तुझं माझ्या मुलीशी लग्न लावून देतो' असंम्हणून परत बोलावलं नाही.... सिनेमात लग्नही दाखवलं नाही. अर्थात -

पॉप्स: ही स्टोरी जगावेगळी नाही. 

प्रीती: त्यामुळे 'डोलीसजा के रखना' वगैरे सगळं खोटं आहे. डोलीउठलीच नाही. करा मान्य!

राज: पण मी कुठे म्हटलं आमची स्टोरी युनिक आहे असं? 

राहुल: जग म्हणतंय. मी तर नेहमीच ऐकत आलोय!

प्रीती: शिवाय आज तीस वर्षांचं कौतुक कशासाठी? 

पॉप्स: चल ग सीमे. निघूया आपण. 

प्रीती: चला. निघूया.

राज: (राहुलचा हात सोडतो) थांबा! थांबा!

राहुल: मी जाऊ पळून?

राज: प्रीती - तुम्हीही तीच चूक करताय.

प्रीती: कोणती चूक?

राज: आज मी राहुलचा हात सोडला तर तो सिम्मीबरोबर जाईल -अर्थात, पळून! आणि माझी स्टोरीपळून जायचीच होती असंच तू सांगितलंस ना? मगराहुल जर आज पळाला तर ही कहाणी फक्त "डी. डी. एल. जे. २" होईल. 

पॉप्स: हो राज बोलण्यात तरबेज आसा. तुका फसवतलो पुन्हाप्रीती.

सिमरन: नाही हो. तो बरोबरच बोलतोय.

प्रीती: ते काही नाही. सिम्मी आणि राज पळून जाणारच. 

तिघे भांडतात. 'शक्यनाही', 'हेच शक्य आहे','अजिबात नाही' इत्यादी.मागे हळूच सिम्मी राहुलचा हात धरते आणि दोघे प्रेक्षकांना बाय बाय करत निघूनजातात.

सिमरन: (भानावर येत) अरे राज - गेले ते,पळाले.

राज: सिनोरिटा, छोट्याछोट्या देशांत अशा मोठ्या मोठ्या गोष्टी होतच असतात!

प्रीती / पॉप्स: काय?

राज: काही नाही हो. (प्रेक्षकांकडेबघून) अहो निवेदिकाबाई,या इकडे. (आणि प्रीती-पॉप्सना) आणि तुम्ही आणा धरून राहुलआणि सिम्मीला.

निवेदिका स्टेजवर येते. प्रीती-पॉप्स,सिम्मी-राहुलही येतात.

राज: कळलं का, आतायांच्या ‘डी डी एल जे टू’ ची गोष्ट जगाला भूल घालणारी आहे असंम्हणायचं. फक्त तिच्यातून संस्कार झालेत असं म्हणायचं- 

सगळे: नाही!

 (

पडदा पडतो.)

 

- कुमार जावडेकर
 •  0 comments  •  flag
Share on Twitter
Published on July 17, 2025 23:48
No comments have been added yet.