खिन्न रात्रींचे मुके आक्रंदणे शोधू जराचांदण्याने भिजवलेली अंगणे शोधू जरा
खिळखिळ्या खिडक्यांतुनी का रोज ही दिसती भुते
हरवलेले आपले बुजगावणे शोधू जरा
वाट चुकलो की नवा पथ पावलांना गवसलाभेटलो इतके खरे, पण- कारणे शोधू जरा
चांदण्यांची रोजची वर्दळ नभी आहे तरीआज चंद्राच्या मनीची धोरणे शोधू जरा
निरनिराळे अर्थ शब्दांना जरी असले तरीफक्त त्यांचे रूप मोहक देखणे शोधू जरा
एक घडते भेट, पडते एक उत्कट ती मिठीचल पुन: लाटेप्रमाणे विखुरणे शोधू जरा
- कुमार जावडेकर
Published on June 03, 2020 12:02