भास असे हे भाषेचे
एकाएक मी अनुभवले
कोठे भाग घेऊनि भागले
कोठे भाग देउनी उरले
एक असते ते वीट येणे
एक तो सर्वज्ञ उभा विटेवरी
कोणी विचारले भाव जगातले
कोणी सांगितले भाव मनातले
कर्मयोगी ने मान मिळवला
हठयोगीने मान ताटली
विषुववृत्त हे स्थान होऊनि
कवितेचे वृत्त जाहले
कोणी राग गायले
आणि कोणी राग दाखविले
कोणी माझी भेट घालती
मी कोणाला भेट दिले
सौंदर्य शब्दांचे तरीही
मला शेवटी असे कळले
दुपट्यात घेतले जेव्हां तिला मी
प्रेम तिचे दुपटीने ने मिळाले
Published on February 03, 2019 20:30