Milind Bokil > Quotes > Quote > Vaibhav liked it

Milind Bokil
“बाबांना अर्थातच टीव्हीमध्ये इंटरेस्ट नव्हता. पण आता त्यांना खेळायला भिडू मिळेनासे झाले. ​सुखटणकरकाका एकदा आले. डाव चांगला रंगात आला होता. पण तेवढ्यात ते 'दिनूच्या सासूबाई' लागलं. तसे काका टुणकन डावावरून उठले.
"जोशीबुवा, माफ करा." ते म्हणाले. "पाहिजे तर आमची हार धरा; पण हे चुकवायचं जमणार नाही."
बाबा मग काय करणार? त्यांनी निमूटपणे पट आवरला.
"आता बुद्धिबळ संपलं!" ते मला म्हणाले.”
Milind Bokil, शाळा [Shala]

No comments have been added yet.