अच्युत गोडबोले > Quotes > Quote > Chetan liked it
“गरीब माणसं कामचुकार असतात, आळशी असतात, दारू पितात म्हणून ती गरीब असतात याही युक्तिवादाला काहीच अर्थ नव्हता हे पटलं होतं. ते गरीब आणि बेकार असल्यामुळे व्यसनी होतात; ज्यातून आनंद मिळेल, नवीन शिकायला मिळेल, ज्यातून परिपूर्ण झाल्यासारखी म्हणजे सेल्फ़ ॲक्च्युलायजेशनची भावना निर्माण होईल असं काम नसल्यामुळे आणि शिवाय केलेल्या कामाचा मोबदला न मिळाल्यानं आणि कामाचा संपूर्ण उत्पादनव्यवस्थेशी संबंध न कळल्यानं जे एलियनेशन येतं, त्यामुळे त्यांचं कामात लक्ष लागत नाहीआणि मग आपण त्यांना आळशी म्हणतो हे समजलं होतं. जर कामात नाविन्य असेल, तर काही शिकल्याचा आनंद आणि नवनिर्मितीची सर्जनशीलता असेल, तर ते हे काम, काम न वाटता आनंददायी गोष्ट वाटेल आणि ते करण्यासाठी लोक वाट बघतील; त्यांचा आळस कुठल्या कुठे पळून जाईल हेही जाणवत होतं. थोडक्यात कामाच्या स्वरूपात त्यांच्या आळशीपणाची कारणं दडली होती. घरगडयापासून ते शेतमजूरापर्यंत किंवा कामगारापर्यंत जेव्हा त्यांना आळशी म्हणण्यात येतं तेव्हा मी ते तसं म्हणणा-याला एकच प्रश्न स्वतःला विचारायला लावतो.. तो म्हणजे तसचं काम अनेक महिने , वर्षं तुम्हाला करायला सांगितला तर तुम्ही स्वतः ते न कंटाळता, उत्साहानं कराल का? आणि तसं काम वर्षांनुवर्षं करायला तुम्ही कंटाळा केलात आणि जर तुम्हाला कोणी आळशी आणि कामचुकार म्हटलं तर चालेल का?”
― मुसाफिर [Musafir]
― मुसाफिर [Musafir]
No comments have been added yet.
