मराठी वाचक (Marathi Readers) discussion

नादवेध [NaadVedh]
This topic is about नादवेध [NaadVedh]
3 views
०२. पुस्तक-परीक्षण | Book Review > संग्राह्य "नादवेध"

Comments Showing 1-1 of 1 (1 new)    post a comment »
dateUp arrow    newest »

अनिकेत (mahajanianiketanil) | 49 comments Mod
ओंकाराच्या आदिम नादापासून निर्माण झालेला स्वर माणसाने कंठस्थ केला, साचेबद्ध केला. यातुन निर्माण झालं शास्त्रीय संगीत. हिंदुस्थानी असो कि कर्नाटकी, दोन्ही भारतीय शास्त्रीय संगीताच्या मुख्य शाखा आहेत.समजायला थोडं अवघड असेल म्हणुन किंवा आधुनिक संगीताचा पगडा म्हणुन सामान्य माणसाला ते फारसं भावलं नाही."नादवेध" च्या निमित्ताने लेखक द्वयीनी या विषयाची अभ्यासपुर्ण व सोप्या शब्दात मांडणी वाचकांसमोर ठेवली आहे.

मुख्यतः "हिंदुस्थानी"तील जवळपास ७० रागांची दुपानी लेखांतुन माहिती असल्याने, पुस्तक वाचताना खुप रेंगाळल्यासारखं होत नाही. शिवाय प्रत्येक राग, त्याचे विशेष,लोकप्रिय हिन्दी/मराठी चित्रपट,नाट्यगीतांची उदाहरणं देऊन हलक्याफुलक्या पद्धतीने समजावला आहे.त्यामुळे माहिती वाचताना वाचकाला हरवल्यासारखं होत नाही.

स्वतःचा संगीतप्रवास,रागांची ओळख व स्वभाव,त्यावर बेतलेली प्रसिद्ध गाणी,गीतकार,संगीतकार,गायकांचे किस्से/आठवणी, त्याला अनुरूप कवितांच्या ओळी असा रंजक "नादवेध" यात आहे. गानरसिकांसाठी तर हा माहितीचा अद्भुत खजिनाच ठरणार असुन शास्त्रीय संगीताबद्दल जाणुन घेण्याची इच्छा असणाऱ्यानाही या पुस्तकाची बरीच मदत होईल हे सांगणे न लगे !

आणि हो ! परिशिष्ट नक्कीच विशेष आहे, तेव्हा भविष्यात संदर्भासाठी संग्राह्य असेच पुस्तक आहे.


back to top