* Description: हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा इतिहास विशेष संघर्षाचा आणि बलिदानाचा आहे. या मुक्तिसंग्रामातील हिंदुत्वनिष्ठ मंडळींचा सहभाग आजवर क्वचितच मांडण्यात आला. हैदराबाद मुक्तीचा पहिला मोठा आणि संघटित लढा 'भागानगर निःशस्त्र प्रतिकार' या नावाने सप्टेंबर १९३८ ते ऑगस्ट १९३९ या काळात लढला गेला. या लढ्यात हिंदुत्वनिष्ठ मंडळींनी, विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी बजावलेल्या कामगिरीचा परामर्श प्रस्तुत पुस्तकात घेण्यात आला आहे. विषयाच्या अनुषंगाने निजाम राजवटीच्या वास्तविक स्वरूपाचा तसेच विविध नेत्यांच्या आणि संघटनांच्या भूमिकांचा आढावा घेण्यात आला आहे. पुस्तक प्रामुख्याने 'केसरी' वृत्तपत्राच्या समकालीन अंकांवर आणि रा.स्व.संघाच्या अभिलेखागारातील मूळ कागदपत्रांवर आधारलेले असल्यामुळे त्याला संदर्भमूल्य आहे. विषय सहजपणे समजण्याच्या दृष्टीने पुस्तकात कोष्टके, मानचित्रे आणि छायाचित्रे देण्यात आली आहेत. पुस्तकाचे लेखक डॉ. श्रीरंग गोडबोले इस्लाम, मुस्लिम इतिहास आणि रा.स्व. संघाच्या इतिहासाचे साक्षेपी अभ्यासक आहेत. त्यांनी वर्णिलेला इतिहास ८५ वर्षे जुना असला तरी तो आजही प्रेरणादायक, बोधप्रद आणि म्हणून प्रासंगिक आहे.
* Author: Shrirang Godbole
* ISBN (or ASIN): 9395664495, 978-9395664493
* Publisher: Bharatiya Vichar Sadhana
* Publication: 2023
* Page count: 128
* Format: Paperback
* Description: हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा इतिहास विशेष संघर्षाचा आणि बलिदानाचा आहे. या मुक्तिसंग्रामातील हिंदुत्वनिष्ठ मंडळींचा सहभाग आजवर क्वचितच मांडण्यात आला. हैदराबाद मुक्तीचा पहिला मोठा आणि संघटित लढा 'भागानगर निःशस्त्र प्रतिकार' या नावाने सप्टेंबर १९३८ ते ऑगस्ट १९३९ या काळात लढला गेला. या लढ्यात हिंदुत्वनिष्ठ मंडळींनी, विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी बजावलेल्या कामगिरीचा परामर्श प्रस्तुत पुस्तकात घेण्यात आला आहे. विषयाच्या अनुषंगाने निजाम राजवटीच्या वास्तविक स्वरूपाचा तसेच विविध नेत्यांच्या आणि संघटनांच्या भूमिकांचा आढावा घेण्यात आला आहे. पुस्तक प्रामुख्याने 'केसरी' वृत्तपत्राच्या समकालीन अंकांवर आणि रा.स्व.संघाच्या अभिलेखागारातील मूळ कागदपत्रांवर आधारलेले असल्यामुळे त्याला संदर्भमूल्य आहे. विषय सहजपणे समजण्याच्या दृष्टीने पुस्तकात कोष्टके, मानचित्रे आणि छायाचित्रे देण्यात आली आहेत. पुस्तकाचे लेखक डॉ. श्रीरंग गोडबोले इस्लाम, मुस्लिम इतिहास आणि रा.स्व. संघाच्या इतिहासाचे साक्षेपी अभ्यासक आहेत. त्यांनी वर्णिलेला इतिहास ८५ वर्षे जुना असला तरी तो आजही प्रेरणादायक, बोधप्रद आणि म्हणून प्रासंगिक आहे.
* Language: Marathi
*Link: https://www.amazon.in/dp/9395664495/?...