Indian Readers discussion
This topic is about
अँड दे लिव्ह्ड हॅपिली एव्हर आफ्टर..
Promotions - New books n Authors
>
नवीन पुस्तक..
date
newest »
newest »


मला आशा आहे की तुम्ही सगळे सेफ असाल.
मी आत्ताच एक नवीन कादंबरी लिहिली आहे. विषय थोडा वेगळा पण मला आशा आहे वाचकांना हे पुस्तक आवडेल.
पुस्तकाविषय थोडेसे-
प्रत्येक गोष्टीचा शेवट गोड हवाच.. तो झाला नाही तर गोष्ट पूर्ण झाली नाही असं समजायचं.. "अँड दे लिव्ह्ड हॅपिली एव्हर आफ्टर.." ही प्रेम, खुन्नस आणि सस्पेन्स वाढवणारी एक रोलर कोस्टर राईड आहे. ही गोष्ट आभा, राजस आणि रायन च्या आयुष्याभोवती फिरते. आभा नवीन कंपनी जॉईन करते आणि तिथे तिची भेट होते राजस शी... हाच तो राजकुमार असं वाटत असताना तिच्या आयुष्यात एन्ट्री होते रायन ची.. रायन तसा केअरलेस.. तो आभा च्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असतांनाच रायन च्या आयुष्यात एक वादळ येतं.. काय होतं रायन च्या आयुष्यात? रायन त्यातून बाहेर येतो? त्याला कोणाची मदत होते? विचार सुद्धा केला नसेल अश्या काही अनपेक्षित घटना घडणार आहेत तर कधी अनपेक्षित घटना विचार करायला भाग पाडणार आहेत.
रायन चा किस्सा संपतो आणि आभा आणि राजस ची लव्ह स्टोरी चालू होते पण आभा ला धमकीचे फोन यायला लागतात. आभा ला धमकी कोण देतंय? काही अघटीत घडणार? आभा, रायन आणि राजस बद्दल अजून जाणून घ्यायची उत्सुकता वाढली? मग नक्की वाचा माझी पहिली कादंबरी - "अँड दे लिव्ह्ड हॅपिली एव्हर आफ्टर.. "
https://www.amazon.in/gp/product/B09K...
माझी कादंबरी नक्की वाचा आणि प्रतिक्रिया द्यायला विसरू नका.
धन्यवाद,
काळजी घ्या,
अनुजा.