पुत्रजन्माचा आनंद महत्त्वाचा खराच; पण ते बाळ मोठं होताना जी संकटं येतात, त्यांना तोंड द्यायची तयारी असणं हे जास्त महत्त्वाचं. एखाद्या नवजात अर्भकाप्रमाणे हा कारखाना मोठा होताना संकटं येतील. दात येताना त्रास होतो तसा होईल; ताप येईल, तो वाढला, तर कदाचित आकडीही येईल. पण चांगले आईवडील ज्याप्रमाणे धीर न सोडता मोठ्या हुशारीनं या सगळ्याला सामोरं जातात आणि बाळाला वाढवतात, ते उदाहरण आपल्या डोळ्यांसमोर असायला हवं. तुमची आणि आमची कसोटी लागणार आहे ती तेव्हा, याचं भान असू द्या.”

