More on this book
Kindle Notes & Highlights
यशात अनेकांना वाटेकरी करायचं असतं, म्हणजे मग ती माणसं अपयशातही आपल्याबरोबर राहतात,
“अरे, तू काय काय करणारेस? तुला गिरण्या चालवायच्यात, पोलादाचा कारखाना काढायचाय, इमारती बांधायच्यात आणि त्यात हे आता भटारखान्याचं खूळ काय शिरलंय तुझ्या डोक्यात?”
पुत्रजन्माचा आनंद महत्त्वाचा खराच; पण ते बाळ मोठं होताना जी संकटं येतात, त्यांना तोंड द्यायची तयारी असणं हे जास्त महत्त्वाचं. एखाद्या नवजात अर्भकाप्रमाणे हा कारखाना मोठा होताना संकटं येतील. दात येताना त्रास होतो तसा होईल; ताप येईल, तो वाढला, तर कदाचित आकडीही येईल. पण चांगले आईवडील ज्याप्रमाणे धीर न सोडता मोठ्या हुशारीनं या सगळ्याला सामोरं जातात आणि बाळाला वाढवतात, ते उदाहरण आपल्या डोळ्यांसमोर असायला हवं. तुमची आणि आमची कसोटी लागणार आहे ती तेव्हा, याचं भान असू द्या.”
काही काही मानवसमूह श्रम करूनही गरीब राहतात, काहींना विनाश्रम संपत्ती मिळते, हे का होतं - हा प्रश्न त्यांना सतावायचा.
“तुम्ही सर्वोत्तमाचा ध्यास घेतलात, तर चांगलं काम कराल. चांगल्याचीच इच्छा ठेवली, तर तुमचं काम बरं होईल. तेव्हा अतिउत्तमाकडेच आपलं लक्ष असायला हवं,”
Vikram Choudhari liked this
एकदा जेआरडी ‘एसीसी’त आले असता मुळगावकरांना म्हणाले, “दोन विटांना जोडणारा डिंक तयार करण्यात तू किती वेळ वाया घालवणारेस?”
“एखादी गोष्ट अत्युत्तमाच्या पातळीवर सातत्यानं करत राहणं हे भारतीयांना अवघड जातं. एकदाच कधी तरी अत्युत्तमाची पातळी गाठायची आणि मग पुन्हा ये रे माझ्या मागल्या - असं करून चालत नाही. मी जे करीन ते अत्युत्तमच असेल, अशी सवय आपल्या रक्तात भिनायला हवी. दुसऱ्या दर्जाचं काम मी स्वीकारणारच नाही, अशी स्वत:ची धारणा हवी. ती एकदा का बाळगली, की साध्या बुद्धिमत्तेची व्यक्तीदेखील उत्कृष्ट काम करून जाते. जगाच्या बाजारपेठेत आपल्याला उतरायचं असेल, तर अत्युत्तमाच्या ध्यासाला पर्याय नाही.”
Vikram Choudhari liked this
‘फायदा हा उत्पादकतेतून यायला हवा. अनुकूल बाजारपेठेत कृत्रिमरीत्या भाववाढ करून पैसे कमावणं हा काही मार्ग नाही. ग्राहकाला नाडणं हे कोणत्याही फायद्याच्या मुळाशी असता कामा नये,’
Vikram Choudhari liked this
‘अलीकडच्या लोकशाहीत राजकीय मंडळींनी काहीही बोलावं, ही जरी प्रथा पडली असली, तरी त्यामुळे यात पहिला बळी जातो, तो सत्याचा - याची जाणीव राजकारण्यांना नाही.
कोणी ना कोणी आपल्याला काही ना काही देत राहील, या मानसिकतेतून आपण बाहेर यायला हवं.
Vikram Choudhari liked this
संपत्तिनिर्मिती ही आनंदाइतकीच कर्तव्याची बाब आहे इतकी स्वच्छ, प्रामाणिक विचारधारा या उद्योगानं सुरुवातीपासून जोपासलेली आहे,
बऱ्याचदा उघड उघड उपस्थितीपेक्षा तितकीच उघड अनुपस्थिती अधिक लक्ष वेधून घेणारी, अधिक परिणामकारक असते.

