Kindle Notes & Highlights
सदाचार-दुराचार यांच्या काटेकोर हिशेबी जमाखर्चाने पदरात माप टाकणे, ही चोख रुक्ष व्यापारी वृत्ती हा धर्माचा स्वभाव आहे. पण कर्मनिरपेक्ष वैभवी फळ देण्याचे किंवा निदान त्याची अपेक्षा करण्याचा धुंद आनंद देण्याचे औदार्य फक्त जुगारातच असते.
ज्याबाबत देणाऱ्याला कसलीच आसक्ती नाही, त्याचं दान करण्यात औदार्य नाही. ते स्वीकारण्यात घेणाऱ्याला आनंद नाही.
आणि प्रवाशाला वाटले, इतरांचे प्रवास संपतात, रस्ता राहतो; पण आपला मात्र आता रस्ता संपून गेला, आणि प्रवास मात्र चालूच राहणार आहे...
माणूस ज्या वेळी आपले भविष्य जाणण्याची इच्छा दाखवतो, त्या वेळी त्याला अनलंकृत, रुद्र भविष्य नको असते, वर्तमानाविषयी त्याची आसक्ती किंचितही कमी होणार नाही असे एखादे धूसर, आटोपशीर चित्र पाहिजे असते.
काही वेळा भूतकाळच इतका अवजड होतो की त्यात सुदैवाने अज्ञात असलेल्या भविष्यकाळाचे आणखी ओझे कोणाला का हवे असते कोणास ठाऊक!
पण गड्या, प्रत्येक मनुष्य स्वतःच एक धर्मसंस्थापक असतो. तोच संस्थापक आणि तोच अनुयायी, आणि पहिली निष्ठा या स्वतःच्या धर्माशी असते.
काहीतरी क्षुद्र घटना आपण घडवण्यापेक्षा मोठ्या घटना घडत असलेल्या पाहणे, हे मला जास्त आनंदाचे आहे.
पण सुटकेची निव्वळ शक्यता जरी असली तर नियतीचे भय का? आणि सुटकेची काहीच आशा नसेल तर चितेचा तरी ताप का?