गदिमा हे मराठी साहित्यसृष्टीला आणि चित्रसृष्टीला पडलेले एक अभिजात स्वप्न. या स्वप्नाने मराठी माणसांच्या आयुष्याला सोन्याचा मुलामा चढवला. ‘गदिमा’ हा मराठी संस्कृतीने जपलेला एक मोठा संस्कार ठरला. घराघरामध्ये, मनामनामध्ये आणि ओठाओठावर हा संस्कार मोठ्या श्रद्धेने जपला गेला. ज्याची कला लोकजीवनाशी विलक्षण समरस झाली, असा हा महान साहित्यिक होता.

