More on this book
Kindle Notes & Highlights
गदिमा हे मराठी साहित्यसृष्टीला आणि चित्रसृष्टीला पडलेले एक अभिजात स्वप्न. या स्वप्नाने मराठी माणसांच्या आयुष्याला सोन्याचा मुलामा चढवला. ‘गदिमा’ हा मराठी संस्कृतीने जपलेला एक मोठा संस्कार ठरला. घराघरामध्ये, मनामनामध्ये आणि ओठाओठावर हा संस्कार मोठ्या श्रद्धेने जपला गेला. ज्याची कला लोकजीवनाशी विलक्षण समरस झाली, असा हा महान साहित्यिक होता.
‘दगडाच्या देवा, दह्याच्या घागरी, अस्पृश्याच्या घरी ताक नाही ॥ पाळीव पोपट, गोड फळे त्याला, आणि अस्पृश्याला कदन्न का?’
‘चला जाऊ द्या पुढे काफिला अजुनी नाही मार्ग संपला इथेच टाका तंबू! जाता जाता जरा विसावा एक रात्र थांबू इथेच टाका तंबू’
आयुष्यभर पुढे मी हेच पाहत आलो. प्रत्येकाला दुसऱ्याचे आयुष्य आवडते; पण असतात सारेचजण दु:खी.
जीवन ही मरणाची माळ असते हेच खरे.

