Kindle Notes & Highlights
Read between
March 16 - April 29, 2025
पैसा हा माणसासाठी असतो; माणूस पैशांसाठी नव्हे! हे सूत्र जगताना नेहमीच लक्षात ठेवावे.
माता-पिता, भाऊ-बहीण व इतर नातेवाइकांची माया जर ‘कोरडी’ असेल तर अशा नातेवाइकांशी संबंध तोडून टाकावेत. कारण त्यांच्याकडून आपल्याला फक्त मनस्तापच मिळेल. अडी-अडचणीला ते कधीच धावून येणार नाहीत, की कधी दुखऱ्या मनावर फुंकर घालणार नाहीत.
‘थांबला तो संपला’, या उक्तीप्रमाणे सतत कार्यरत असणे, ‘Active’ राहण्यानेच कुठलीही गोष्ट चांगली (प्रवाही, सुरू) राहते. मग तो धातू असो, एखादा अवयव असो, जलप्रवाहादी पंचमहाभूते असोत की माणूस असो!
सुख हे ‘मानण्यात’ आहे; ती ‘बाह्य’ अवस्था नसून मनाची ‘आंतरिक’ अवस्था आहे. शांती, समाधान, तृप्ती, धर्मपालन (माणुसकी) हेच खरे जीवनाचे मर्म आहे; परंतु यासाठी कठोर साधना करावी लागते.
थोडक्यात, सौंदर्य खुलवण्यासाठी प्रसाधने नव्हेत तर गुण हवेत. कुळाचे नाव मोठे करण्यासाठी त्या कुळातील व्यक्ती चारित्र्यसंपन्न हव्यात. मिळवलेले ज्ञान व्यवहारात उपयोगात आणले तरच ते ज्ञान फायदेशीर ठरते आणि आपल्या जवळील संपत्तीचा उपभोग घेतला तरच ते कारणी लागते.
मनुष्यप्राणी हा मुळात स्वार्थीच असतो. धन, बक्षिसी, बढती इत्यादींसाठी तो काहीही करायला तयार असतो. या गोष्टी देण्याची पात्रता नसणाऱ्यांशी त्यांना काहीही देणे-घेणे नसते. म्हणून व्यक्तीने स्वत:च सामर्थ्यवान स्वावलंबी बनण्याचे प्रयत्न करावेत.
आपल्यातील दुर्बलता लपवून आवाज चढवून आपल्याला बोलता आले पाहिजे, अन्यथा लोक आपल्याला जगू देणार नाहीत.
सर्व विश्वाचे भरण-पोषण करणारा परमेश्वर सर्वशक्तिमान आहे. अशी श्रद्धा असल्यावर कसली चिंता? म्हणून फक्त निष्काम भावनेने कर्मे करून ती ऋणनिर्देश म्हणून परमेश्वराला अर्पण करणे, हीच त्याची सेवा. हा भाव मनात असेल तर आयुष्यात काहीच कमी पडत नाही.
मानवाने बुद्धीचे ‘अग्निहोत्र’ जाज्वल्य ठेवावे. नवनवीन ज्ञानसमिधा त्यात टाकाव्यात.
ज्याप्रमाणे कडुनिंबाच्या वृक्षाला दूध आणि तुपाचा अभिषेक करूनही त्यात माधुर्य येत नाही, त्याप्रमाणेच दुर्जन व्यक्तीला नाना प्रकारे समजावून किंवा शिकवूनही ती सज्जन बनू शकत नाही. भावार्थ : व्यक्तीचा मूळ स्वभाव बदलता येत नाही.