माठूरामचं भाषण संपल्यावर मुख्य पाहुणे बाबासाहेब जोशी इंग्रजीतून बोलायला उठले. दाहेक मिनटं जोरात सोशालिझमवर इंग्रजी बोलून झाल्यावर मग मुद्दा नसतांना ते निव्वळ इंग्रजी बोलत राह्यले. मधे एकदा काय झालं तर इंग्रजी बोलता बोलता ते एकदम मराठी शब्द बोलून गेले.... पावर इज इन द हॅन्ड्स् ऑफ द करप्ट... म्हणून... त्यांनी मधेच म्हणून असं म्हटल्याबरोबर पोरंही म्हणून! म्हणून! करत ओरडली.