तो म्हणाला, माझी उमेदीनं जगण्याची इच्छा कमी होता कामा नये. दगदग नाही सांगितली होती. तंबाखू, खूप चहा नाही सांगितला होता. काळजी तर विषासारखी हेही माहीत होतं. ती त्या वेळची हास्पिटलं. ती वर्षं. ऐन उमेदीत खाक झालेले विशीतीले दिवस. एकट्यानं सापासारखं जवळ बाळगलेलं दुःख. सगळं आठवून तो हादरून गेला. पायाखालची जमीन निसटून चाललीय असं वाटलं.