ब्राम्हणच काय पण सबंध हिंदूधर्मच बंदिस्त आहे. मोठमोठे लोकसमूह हिंदू होऊ शकले पण एकटादुकटा परका माणूस हिंदू होऊच शकत नव्हता पूर्वीसुद्धा. आता तर हिंदूधर्म संपूर्ण मेला आहे. कोणालाच हिंदू होता येत नाही. उलट शीख आणि जैन आणि लिंगायत हे स्वतःला हिंदू म्हणायला तयार नाहीत. जे दुरावले त्यांनाही परत आत घेता आलं नाही असा हिंदुधर्म आहे. निव्वळ प्रेत म्हणून त्याची व्यवस्था पहावी लागते आहे. हिंदुधर्म गाडून टाकल्याशिवाय ह्या देशात नवा समाज निर्माण होणार नाही.