आपल्या श्रद्धा म्हणजे ब्राम्हणी श्रद्धा निव्वळ नकोत. वारकरी, महानुभाव यांच्याही श्रद्धा ब्राम्हणांनी थोड्याशा जवळ घ्याव्या. भेदाभेद नको, स्त्रीपुरुष यांच्यात आर्यसंस्कृतीइतकं अंतर नको-हेही ब्राम्हणी पक्षांनी पुढे मांडावं. निव्वळ गायी आणि वेद हेच नको. ह्या बहुतेक संघवाल्यांची मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये जातात. स्वभाषा मात्र नको पण देशाभिमानाचं स्तोम दुसरीकडे. विचारा भोपटकरांना, तुमची मुलं कुठल्या शाळेत जातात हो? कॉन्वेंटमधे-त्याचं कारण— कारण सांगू नका. तेवढं पुरे आहे!