शेंडे म्हणाला, कवितेबद्दल तर बोलूच नको गंग्या. कोणी कवितेबद्दल गंभीर विचार करतो असं मला वाटत नाही. निव्वळ विदूषकी करून सगळे प्रसिद्ध कवी जगताहेत. चार मित्र वा वा करतात याच्या पलीकडे कवितेला काही अर्थ राह्यला नाही. कुठेतरी उकिरड्यावर सापडणाऱ्या शेकडो रानफुलांसारखं कवींचं झालं आहे.