आपले कुलकर्णी नवराबायको स्कुटरवरून नेहमी येतात जातात, अय्यरबाईंचा नवराही विद्यापीठात जाता जाता स्कूटरनं तिला कॉलेजवर सोडून जातो तर चिपळ्याला पुढे नवरा आणि मागे बायको हे स्कूटरवरचं नेहमीचं दृश्य पाहून उगाच संताप येतो! म्हणतो, पहा कसे शंकरपार्वती कायम नंदीवर असतात तसेच दिसताहेत साले! पुराणात विष्णू आणि लक्ष्मी कायम गरुडावर तसे हे स्कूटरवर कायम बरोबर! कदाचित आताच्या व्हेस्पा-लँब्रेटासारख्या नंदी, गरुड वगैरे नावाच्या स्कुटरीच असाव्या त्या काळात! हॅ हॅ