महारांनी संघटित व्हावं, विचारी व्हावं, प्रगती करावी म्हणून ते अहोरात्र काम करायचे. त्यामुळे त्यांच्या जातीतल्या राजकीय पुढाऱ्यांचं आणि त्यांचंही जमत नसे. ते दर सुटीत गावाकडे जाऊन तिकडच्या गरीब महारांना इकडे चंबूगबाळ्यासकट घेऊन यायचे. आणि गावात जिथे कुठे मोकळी जागा सापडेल तिथे सरळ त्यांना झोपडपट्टी वसवायला सांगायचे. कुठे म्युनिसिपालटीनं बागेसाठी जागा राखून ठेवलेली असली की हे म्हणायचे, बांधा इथे झोपड्या. बागा पाह्यजेत भडव्यांना! भरून टाका ही सगळी जागा! ह्यासाठी त्यांनी दोन महार वकीलही खास झोपडपट्टीवाल्यांचे प्रश्न सोडवायला नेमले होते. मेघे म्हणजे फार तरुण वयातच पावरफुल पुढारी होऊन बसले होते.
...more