चांगदेव म्हणाला, मेघेसाहेब अशी ज्या त्या जातीची डबकी बांधण्यापेक्षा सगळ्या मराठी समाजानं एक मोठा समुद्रच का उभारू नये, ज्यात सगळ्यांना आपापलं स्वातंत्र्य उपभोगता येईल? ब्राम्हणी साहित्याचे निकष धुडकावून दलित साहित्याचे निकष पुढे आणण्यात मला काहीच कर्तबगारी वाटत नाही. शेवटी ज्ञानेश्वरी न् दासबोध कुठल्याही मराठी माणसाला टाळता येणार नाही.