चिपळूणकर म्हणाला, म्हणजे आईबापांनी जुळवलेली लग्नंही सुंदर समजतोस का तू अजून? भोळे म्हणाला, तेच सांगतोय मी की आपण सगळ्या पाश्चात्य कल्पनांनी आपले व्यवहार पहायला लागलो की काहीच सुंदर वाटणार नाही. आपलं बोटांनी जेवणसुद्धा सुंदर वाटणार नाही! आणि कुठलीही युरोपियन बायको कोणी केली की ती कितीही कुरूप असो, आपण रोम्यांटिकपणानं ते सुंदर समजतो. कुठलाही परदेशी चेहरा आकर्षक वाटतो!