एकदा भल्लानं त्याला गुड मॉर्निंग केलं तर हा थांबून घड्याळात काळजीपूर्वक पाहून भल्लाला म्हणाला, मला वाटतं आता पी.एम्. सुरू झालं आहे! गुड आफ्टरनून! मग स्टाफमधे येऊन चांगदेवला आणि चांगल्या देशपांडेला तो म्हणाला, भल्लाची मस्त चूक काढली! माझ्या इंग्रजीवर बोलतो भडवा! जी ए एन् डी वर एल् ए टी एच् घातली पाहिजे साल्याच्या. सी एच यू टी वाय् ए आहे!