भोळे म्हणाला, तुमचं ठीक आहे देशपांडे, तुमच्यासारख्या लोकल माणसांना काहीही करता येतं. आमच्यासारख्या उपऱ्या माणसांना हे स्वातंत्र्य नसतं. आम्हाला ढोरमेहनत करूनच आमचं अस्तित्व सिद्ध करावं लागतं. तसा मी सुद्धा सुरुवातीला तिकडे असाच वागायचो. पण नंतर माझ्या लक्षात आलं की जोपर्यंत तुम्ही ह्या जगन्नाथाच्या रथाच्या गर्दीत स्वत: होऊन घुसत नाही, रथ ओढत नाही, तोपर्यंत तुमच्या विचारांनाही कोणी किंमत देत नाही. नाहीतर वावदूक समजतात तुम्हाला हे गाढवकाम करणारे.