आयुष्यातले आनंदाचे अनेक क्षण, उपेक्षेचे हुंदके, दुःखाचे कढ आणि आवर घातलेले आवेग– हे ज्याचे त्यालाच माहीत असतात. एखादा तरी साक्षीदार अशा उन्मळून टाकणाऱ्या क्षणी जवळ असावा ह्यासारखी इच्छा पुरी न होणं ह्यासारखा शाप नाही, पण साक्षीदार मिळून त्याला त्यातली उत्कटता न कळणं ह्यासारखी वेदना नाही. त्यापेक्षा एकलेपणाचा शाप परवडला.