Varun Deshpande

41%
Flag icon
भ्रष्टाचाराची जाणीव डॉ. सिंग यांना असूनही ते त्याला आळा घालू शकत नव्हते. कारण त्यांनी तसा प्रयत्न जर केला असता, तर ज्या राजकीय व्यवस्थेचे ते नामधारी प्रमुख होते, ती व्यवस्था कोलमडली असती. आघाडीच्या सहकारी पक्षांचे जे प्रमुख होते, त्यांच्या हाती राजकीय सत्ता होती आणि पंतप्रधान या नात्याने डॉ. सिंग स्वत:च्या मर्जीनुसार मंत्र्यांना काढून टाकू शकत नव्हते. पण या मंत्र्यांना शिस्त लावण्यासाठी ते आणखी काहीतरी नक्की करू शकले असते. हे करण्याचा एक मार्ग होता, भ्रष्ट मंत्र्यांच्या हाताखाली सचिव म्हणून कर्तव्यदक्ष, सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक करणे. पण याही बाबतीत स्वत:चा आग्रह पंतप्रधानांनी चालवला नाही. ...more