साठीपेक्षा अधिक वर्षे पद्मा या सातत्याने कविता लिहीत आहेत. हे सातत्य इंदिरा संत आणि संजीवनी मराठे यांच्या कवितालेखनातही आहे. या दृष्टीने या तिघींत साम्य आहे. हे साधम्र्य आणखीही काही गोष्टींत जाणवते. सुशिक्षित, सुसंस्कृत आणि काव्य विषयीच्या आधुनिक जाणिवांनी संपन्न असे लेखन करणार्या कवयित्रींची पहिली पिढी या तीन कवयित्रींच्या रूपाने मराठी काव्यात प्रकट झाली. काव्यविषयक जुने संकेत, परंपरा यांचा आढळ त्यांच्या काव्यात होतो; पण

