Kindle Notes & Highlights
‘मासळीच्या स्वादा’पासून तो ‘ज्ञानेशाच्या अमृत ओवी’पर्यंत जीवनात जे जे सुंदर, आस्वाद्य, रसपूर्ण वाटले, ते सारे बोरकरांनी आपल्या काव्यात रंगवले.
इंग्रजीमध्ये एक सुंदर वचन आहे. Nature abhors vacuum, निसर्गाला पोकळी मंजूर नाही. वास्तव, भौतिक सृष्टीतली कोणतीही पोकळी निसर्ग जसा लगेच भरून काढतो, त्याप्रमाणेच रिते मनही तो पुन्हा परिपूर्ण करतो.
साठीपेक्षा अधिक वर्षे पद्मा या सातत्याने कविता लिहीत आहेत. हे सातत्य इंदिरा संत आणि संजीवनी मराठे यांच्या कवितालेखनातही आहे. या दृष्टीने या तिघींत साम्य आहे. हे साधम्र्य आणखीही काही गोष्टींत जाणवते. सुशिक्षित, सुसंस्कृत आणि काव्य विषयीच्या आधुनिक जाणिवांनी संपन्न असे लेखन करणार्या कवयित्रींची पहिली पिढी या तीन कवयित्रींच्या रूपाने मराठी काव्यात प्रकट झाली. काव्यविषयक जुने संकेत, परंपरा यांचा आढळ त्यांच्या काव्यात होतो; पण
जुने आणि नवे या दोहोंच्या सीमारेषेवर त्या तिघींची कविता उभी असल्याचे जाणवते.

