शिवाजी राजांना आठ पत्नी होत्या. त्यांची काही लग्नं ते अगदी लहान असतानाच झाली होती. त्यांच्या सर्व पत्नी या प्रतिष्ठित मराठा वतनदार घराण्यातल्या होत्या आणि त्यांची नावं होती सईबाई, सोयराबाई, सगुणाबाई, पुतळाबाई, लक्ष्मीबाई, सकवारबाई, काशीबाई आणि गुणवतीबाई. राजांना दोन मुलगे आणि सहा मुली होत्या. औरंगजेबाच्या चार पत्नी होत्या. दिलरस बानू (पर्शियन शिया मुस्लीम), नवाब बाई (कश्मिरी हिंदू, नंतर मुस्लिम धर्म स्वीकारला), औरंगाबादी महल (मुस्लीम), उदेपुरी महल (ही दारा शुकोहची रखेल होती. काही जणांच्या मते ती जॉर्जीअन गुलाम स्त्री होती.) औरंगजेबाला चार मुलगे आणि पाच मुली होत्या.

